26 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्रLay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

‘लय भारी’च्या (Lay Bhari) संपादक पदावर ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (शनिवारी) पाटील यांनी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. व्यवस्थापकीय संचालक तथा व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात (Tushar Kharat) यांनी पाटील यांच्याकडे संपादकपदाची सूत्रे सुपूर्द करून त्यांचे ‘लय भारी’ परिवारात स्वागत केले. विक्रांत पाटील गेली ३२ वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वार्ताहर पदापासून ते संपादक पदापर्यंत काम केले आहे.

‘लय भारी’च्या (Lay Bhari) संपादक पदावर ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (शनिवारी) पाटील यांनी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. व्यवस्थापकीय संचालक तथा व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात (Tushar Kharat) यांनी पाटील यांच्याकडे संपादकपदाची सूत्रे सुपूर्द करून त्यांचे ‘लय भारी’ परिवारात स्वागत केले. विक्रांत पाटील गेली 32 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वार्ताहर पदापासून ते संपादक पदापर्यंत काम केले आहे.

विक्रांत पाटील यांनी लोकमत, सकाळ, ॲग्रोवन, सामना, पुढारी, दिव्य मराठी, महानगर, केसरी, गांवकरी, देशदूत, देशोन्नती, नवशक्ति, जनशक्ति या वृत्तपत्रांमध्ये, तसेच वेब दुनिया या न्यूज पोर्टलमध्येही काम केले आहे. सामना, लोकमत, महानगर व नवशक्ति या दैनिकांमध्ये त्यांनी वृत्तसंपादक म्हणून मुंबईत काम केले आहे. गांवकरी व जनशक्तिचे कार्यकारी संपादक, तर देशदूत व पुढारीचे सिटी एडीटर म्हणून ते जळगाव व पुणे व मुंबईत कार्यरत होते. गांवकरी या दैनिकासाठी त्यांनी नवी दिल्लीमध्ये बातमीदारी केली आहे. याशिवाय, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) या संस्थेत प्रसिद्धी अधिकारी आणि बायजूज या देशातील अव्वल शैक्षणिक युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये पुण्यात सेल्स ऑफिसर म्हणून बिझनेस डेव्हलपमेंटचे काम केले आहे.

सूक्ष्मजीवशास्त्रात पदवी घेतलेल्या विक्रांत पाटील यांनी पुण्याच्या रानडे इंस्टिट्यूटमधून पत्रकारीतेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. नवी दिल्ली येथील IMED संस्थेतून 1997 मध्ये त्यांनी पूर्णवेळ एमबीए पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही CAT रॅंकिंगद्वारे प्रवेश मिळविला होता.

पत्रकारितेत नवनवीन प्रयोग राबविणे आणि ते यशस्वी करणे अशी त्यांची प्रतिमा आहे. डिजिटल माध्यम क्षेत्राचा उद्य होण्यापूर्वीच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी ‘वेबदुनिया’ या न्यूज पोर्टलमध्ये इंदूर व पुण्यात ब्युरो चीफ म्हणून काम केले होते. चपखल शब्दांमध्ये रोखठोक मते मांडणारे पत्रकार म्हणून त्यांची पत्रकारिता क्षेत्रात ख्याती आहे. त्यांनी छोट्या शहरातून तसेच पुण्या-मुंबईतही अनेक नवोदितांना उत्तम मार्गरक्षण करून नव्या पिढीतील अनेक चांगले पत्रकार घडविले आहेत. डिजीटल मीडिया, सोशल मीडिया तसेच नवतंत्रज्ञानाचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यात त्यांना विशेष रस असून ले-आऊट व डिझाईन यातही उत्तम समज आहे. महाराष्ट्रातील मल्टिप्लॅटफॉर्म कंटेंटची जान असलेल्या मोजक्या पत्रकारात विक्रांत पाटील यांचे नाव घेतले जाते. त्यांनी 4 वर्षे मंत्रालयात पत्रकारिता केलेली असून अनेक विधीमंडळ अधिवेशनांचेही रिपोर्टिंग केलेले आहे.

जळगाव येथील शेकडो कोटी रुपयांचा झालेला घरकूल घोटाळा देशभरात गाजला होता. या घोटाळ्याचे दिव्य मराठीतून अचूक, अभ्यासू, संशोधनात्मक व प्रभावी वार्तांकन विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने केले होते. त्यामुळे सरकारला घोटाळेबाजावर कारवाई करावी लागली. पुढे जाऊन न्यायालयानेही घोटाळेबाजांना शिक्षा ठोठावली होती. त्यात तत्कालिन मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

सन 2016 मध्ये तत्कालिन महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. लाचखोरी, हप्तेबाजी, गुन्हेगारी संबंध ते जमीन घोटाळा अशा एका पाठोपाठ एक गंभीर आरोपाच्या जाळ्यात ते अडकले होते. त्या विरोधात पाटील यांनी आक्रमक बाजू लावून धरली होती. विक्रांत पाटील यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता ते ‘लय भारी’ला पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या उंचीवर घेवून जातील, अशा विश्वास तुषार खरात यांनी यावेळी व्यक्त केला.

Lay Bhari appointed Vikrant Patil editor

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी