32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeएज्युकेशनMaharashtra Budget 2023 : 'भरीव शिष्यवृत्ती ते नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये' यंदाच्या...

Maharashtra Budget 2023 : ‘भरीव शिष्यवृत्ती ते नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये’ यंदाच्या बजेटमधील शैक्षणिक सुविधा जाणून घ्या

यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक शैक्षणिक सुविधा आणि योजनांबाबत माहिती देण्यात आली. या बातमीमार्फत यांपैकी काही योजनांची संक्षिप्त माहिती जाणून घेऊ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक शैक्षणिक सुविधा आणि योजनांबाबत माहिती देण्यात आली. या बातमीमार्फत यांपैकी काही योजनांची संक्षिप्त माहिती जाणून घेऊ…

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती; गणवेशही मोफत
– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
– डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
– शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
– कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे
– गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
– डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
– मुंबई विद्यापीठ
– लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन
– वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान
– महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

हे सुद्धा वाचा

Maharashtra Budget 2023 : ‘भरीव शिष्यवृत्ती ते नविन शासकिय वैद्यकिय महाविद्यालये’ यंदाच्या बजेटमधील शैक्षणिक सुविधा वाचून घ्या

Maharashtra Budget 2023 : ‘पुणे रिंग रोड ते पुरंदर विमानतळ’ वाचा कशासाठी किती कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा समाजातील सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
– राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
– सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
– मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे

सक्षम, कुशल अन् रोजगारक्षम युवाशक्ती
– लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच
– नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
– नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
– वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण
– स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था
– नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या उद्योगाला चालना
– मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर ‘मधाचे गाव’ हा उपक्रम राज्यभर राबविणार
– 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
– मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
– 500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये
– 75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये
– 75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
– उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार

खेळांना प्रोत्साहन
– खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध
– बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार
– पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार
– हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान
– नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी