36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget 2023 : इंदूमिल, भिडेवाडा व बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भरीव तरतूद

Maharashtra Budget 2023 : इंदूमिल, भिडेवाडा व बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भरीव तरतूद

अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या बातमीमार्फत यांपैकी काही योजनांची संक्षिप्त माहिती जाणून घेऊ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या बातमीमार्फत यांपैकी काही योजनांची संक्षिप्त माहिती जाणून घेऊ…

पर्यटनाला चालना
– प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
– पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
– 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
– राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश

पर्यावरणपूरक विकास
– राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
– 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
– भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
– जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
– शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
– हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
– 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
– 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
– एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
– डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
– पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
– प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
– ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
– धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
– औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
– गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
– शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी

हे सुद्धा वाचा

Maharashtra Budget 2023 : ‘भरीव शिष्यवृत्ती ते नविन शासकिय वैद्यकिय महाविद्यालये’ यंदाच्या बजेटमधील शैक्षणिक सुविधा वाचून घ्या

Maharashtra Budget 2023 : ‘पुणे रिंग रोड ते पुरंदर विमानतळ’ वाचा कशासाठी किती कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा समाजातील सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न

आम्ही सारे वारकरी
– संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी
– कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

स्मारके
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
– स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
– विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
– स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास
– श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
– श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
– श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
– प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
– गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
– श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये
– श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

स्मरण स्वातंत्र्यसमराचे
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक
– विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके
– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी

माय मराठीच्या सेवेसाठी
– श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
– विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
– मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
– सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये
– राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये
– दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये
– कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
– विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये
– स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी