28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा समाजातील सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा समाजातील सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न

अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून राज्यातील विविध समाजातील घटकांना खूश करण्यासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. या बातमीमार्फत यांपोकी काही योजनांची संक्षिप्त माहिती जाणून घेऊ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून राज्यातील विविध समाजातील घटकांना खूश करण्यासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. या बातमीमार्फत यांपैकी काही योजनांची संक्षिप्त माहिती जाणून घेऊ…

विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी
– बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार
– संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार
– छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

आता महिलांसाठी बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत; महाअर्थसंकल्पातील महिला विशेष योजना

Maharashtra Budget 2023 : ‘नागरिकांच्या आरोग्याची सरकारला काळजी?’ वाचा आरोग्यासाठी काय आहेत तरतुदी…

Maharashtra Budget 2023: जलसंधारणासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना वाचा एका क्लिकवर

नवीन महामंडळांची स्थापना; भरीव निधी सुद्धा देणार
– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
– प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी
– 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
– अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती

अल्पसंख्यकांसाठी विशेष योजना
– अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती
– उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये
गोसेवा, गोसंवर्धन…
– देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार
– आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार
– देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ
– विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
– अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय

धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
– 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
– महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– अहमदनगर येथे मुख्यालय असणार
– राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी

मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी
50 कोटींचा मत्स्यविकास कोष
विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा
– प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
– प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष
– मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली
– त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना लाभ
– वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार
– यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद
– पारंपारिक मासेमारी करणार्‍या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा
– वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
– मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
– दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
– प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
– प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
– उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत

असंघटित कामगार/कारागिर/टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी
– 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
– ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
– माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी
– स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी