28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारचा पहिला महाराष्ट्र अर्थसंकल्प ९ मार्चला...

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला महाराष्ट्र अर्थसंकल्प ९ मार्चला…

२७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, ९ मार्च रोजी सादरीकरण होणार आहे. 

महाराष्ट्र राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून महाराष्ट्राचा अधिकृत अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी शिंदे-फडणवीस सरकार यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष लागून आहे. (Maharashtra budget of the Shinde-Fadnavis government will be presented on March 9)

मुख्यतः शिवसेनेपासून बंड पुकारून सत्ता परिवर्तन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीला सुरू होऊन 25 मार्चला संपणार असून, 2023-24 चा राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर होणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे नवीन राज्य गीत वाजवले जाईल, असे सरकारी प्रकाशनात म्हटले आहे. सभापती राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली पाच विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडली जातील, आणखी आठ विधेयके मंजूर होणे बाकी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री अशा विविध पदांवर काम केलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थसंकल्पात त्यांची मते प्रतिबिंबित होतील याची खात्री करण्यासाठी त्यांनी तज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत, अशी माहीत सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा : शिंदे सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून, फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प!

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

हे ‘आम आदमी’चे नाही, तर महापालिकेच्या कंत्राटदाराचे बजेट ; आपचा ‘बीएमसी’वर हल्लाबोल

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्च रोजी सादर होणार असून 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची रचना आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही किंवा अधिवेशनापूर्वी अर्थ राज्यमंत्री नेमण्यात आलेला नाही. विधानपरिषदेत सध्या एकही राज्यमंत्री नसल्याने अर्थसंकल्प कोण मांडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी