33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याला पाणी योजनेसाठी मिळणार 2784 कोटी! मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..

मराठवाड्याला पाणी योजनेसाठी मिळणार 2784 कोटी! मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे आज शनिवार,16 सप्टेंबर महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मीटिंग होणार आहे. या मिटिंगसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगर येथे दाखल झाले असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठवाडा ही संतांची भूमी आहे असे म्हणत मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाणी योजनेसाठी 2784 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. मराठवाड्याचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी म्हंटले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनिकांना विनम्र अभिवादन करतो. मराठवाड्याच केंद्र म्हणून छत्रपती संभाजी नगर शहराला ओळखले जाते. या शहराने शिक्षण, आरोग्य, औद्योगिक, पर्यटन आणि राजकीय अश्या सर्वच क्षेत्रांच नेतृत्व केल आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील पायाभूत विकासाला मोठी गती दिली आहे. आज आपण अनेक उपक्रम याठिकाणी करत आहोत. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाणी योजनेसाठी 2784 कोटी रुपये दिले आहे. रस्त्यांच्या योजनेसाठी 500 कोटी दिले आहेत. पैठण मधील खराब जलवाहिन्यांसाठी 200 कोटी रुपये आपण दिले. जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा संभाजी नगर साठी शासनाच्या वतीने निधी देण्याचे काम केले आहे.”

“मी नेहमीच शहराच्या पालिका आयुक्तांना सांगत असतो शहराचा विकास करत असताना शहराचा ज्या काही मूलभूत सोई सुविधा आहेत त्याच्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर चांगले रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज सिस्टम, या सगळ्यांमद्धे आपण लक्ष घातले पाहिजे. चांगल्या दर्जाची काम करून घेण्याच काम प्रशासनाने केले आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा 

परराज्यात ऊस निर्यातीला बंदी; राज्य सरकारने ऊचलले मोठे पाऊल

सात वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक; २९ मंत्री, ३९ स्वीय सहायक, सचिव आणि ४०० अधिकारी औरंगाबादमध्ये

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी, शिंदे सरकारचा निर्णय

कॅबिनेट मीटिंग बाबत बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आपल्या मराठवाड्यासाठी घेण्यात येणार आहेत. मराठवाड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. वॉटर ग्रीड सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवणार आहोत. यासाठी केंद्र सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. अनियमित पर्जन्यावरही कायमस्वरूपी तोडगा आपण काढला पाहिजे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून यावरदेखील आपण काम करणार आहोत.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी