28 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमंत्रालयकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी, शिंदे सरकारचा निर्णय

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी, शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे अजून काही बुजले गेले नसल्याने मनसेने या महामार्गावर आंदोलन छेडले आहे. असे असतानाच, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई -बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्यादेखील सूचना आहेत.

मुंबई गोवा महामार्गाच्या एक लेनचे काम १६ सप्टेंबरपर्यंत 100 टक्के काम पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांवरून रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न आज मनसेने केला. यावेळी रविंद्र चव्हाणांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आंदोलनस्थळी माध्यम प्रतिनिधींसोबत पोलिसांची धक्काबुक्की केली.
हे सुद्धा वाचा
गोव्यात फिरायला जाताय; मग हे अॅप डाऊनलोड करा !
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरणाच्या वाटेतील काटे दूर; आज नोटिफिकेशन निघणार?
काळवंडलेले गुडघे, कोपरांमुळे अनकंफर्टेबल वाटते; घरगुती उपायांमुळे दिसेल फरक

असे असतानाच मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय. सिंधुर्दुगकडे जाणारी एक लेन वाहतुकीसाठी खुली होतेय. त्यामुळे नागमोडी कशेडी घाटात होण्याऱ्या वाहतूककोंडीला ब्रेक लागणार आहे. या एका लेनमधून हलक्या वाहनांना सोडलं जाणार आहे. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होणार आहे. दरम्यान गणेशोत्सवात कोकणात जाणारे अनेकजण मुंबई – गोवा महामार्गाने प्रवास करत असतात. या

महामार्गावरची एक लेन जरी सुरू झाली तरी त्यावर ताण पडणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मंडळींनी अन्य मार्गाचा वापर करावा त्याने वाहतूक कोंडी होणार नाही. असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी