29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमहाराष्ट्रपरराज्यात ऊस निर्यातीला बंदी; राज्य सरकारने ऊचलले मोठे पाऊल

परराज्यात ऊस निर्यातीला बंदी; राज्य सरकारने ऊचलले मोठे पाऊल

य़ंदा मोसमी पाऊस पुरेसा न झाल्यामुळे ऊस उत्पादनावर देखील प्रतिकुल परिनाम झालेला आहे. सोलापूर, मराठवाड्यातील ऊस उत्पादनाला मोठा फटका बसला आहे, पाण्याअभावी ऊस पिक होरपळून चालले आहे. पावसाने दडी दिल्याने यंदा ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने परराज्यात ऊस निर्यातीला बंदी घातली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबत 13 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे.

पुरेशा पावसाअभावी यंदा राज्यात ऊस गाळप हंगामात ऊसाचे आणि साखरेचे उत्पादनावर प्रतिकूल परिनाम होण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या साखर आयुक्तांनी सरकारच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे यंदाचा (2023-24) चा राज्यातील ऊस गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालू रहावा यासाठी परराज्यात होणार्या ऊसाच्या निर्यातीवर बंधन घालणे आवश्यक आहे. त्यानूसार ऊस निर्यातीस प्रतिबंध घालत असल्याचे या अधिसुचनेत म्हटले आहे.

यंदा पुरेसा पाऊस नसल्याने ऊसाचे उत्पादन घटल्यास कारखान्याचे लोक ऊस घेण्यासाठी धावपळ करण्याची शक्यता आहे. राज्याच्या सीमा भागात सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस खरेदीसाठी कर्नाटकातील साखर कारखाने धावपळ करु शकतात. त्यामुळे राज्यातील गाळप हंगामावर परिनाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने ही अधिसुचना काढल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा 
सात वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक; २९ मंत्री, ३९ स्वीय सहायक, सचिव आणि ४०० अधिकारी औरंगाबादमध्ये
अक्षय कुमार, ट्विंकल खन्नाचा मुलगा झाला 21 वर्षांचा; मुलाबद्दल काय म्हणाले मॉम आणि डॅड ?
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी, शिंदे सरकारचा निर्णय

राज्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा जवळपास दोन लाख हेक्टर कमी ऊसाची लागवड झाली असल्यामुळे 1 हजार 78 लाख टन ऊस कारखान्यांना ऊपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे यंदा पावसाने ओढ दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्मान झाला आहे, त्यातच पाण्याअभावी ऊसाचे पिक करपत असल्याने अनेक शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस विकत आहेत. चाऱ्यासाठी विक्री होणाऱ्या ऊसाला 4 हजार ते 5 हजार प्रति टन दर मिळत आहे. चाऱ्यासाठी ऊसाची विक्री होत असल्याने देखील गळीत हंगामावर प्रतिकूल परिनाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी