28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 लाख कोटींचा प्रोजेक्ट गुजरातने पळवला!

Maharashtra Politics : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 लाख कोटींचा प्रोजेक्ट गुजरातने पळवला!

गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदाव, इतर मदतीचे आमिष दिल्याचे वृत्त समोर आले आहे, परंतु याबाबत अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. दरम्यान महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 कोटीचा प्रोजेक्ट गुजरातने पळवल्याने विरोधक राज्य सरकारला धारेवर धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राजकारणातील वाद काही थांबण्याचे नाव घेईना. भाजपप्रणित राष्ट करण्याचा मानस ठेवणारे अनेकजण महाराष्ट्राला खाली कसे आणता येईल यासाठी खूप प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर या हालचालींना कमालीचा वेग प्राप्त झाला आहे, त्यामुळे नेमकं राज्यात चाललंय तरी काय असा सवालच या निमित्ताने विचारण्यात येत आहे. राज्यातील अनेक उद्योग गुजरातमध्ये जातात असा आरोप बऱ्याचदा होतो परंतु आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 कोटीचा प्रोजेक्ट गुजरातने पळवला असल्याचे आदित्य ठाकरेंनी ही धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खळबळजनक बाब उघडकीस आणली आहे. ट्विटमध्ये आदित्य ठाकरे लिहितात की, भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय याचा आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही अंतिम करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

 

हे सुद्धा वाचा…

Navneet Rana भांडकुदळ नवनीत राणांच्या विरोधात निवृत्त पोलीस संघटना मैदानात !

Shiv Sena : शिवसेना दसरा मेळावा, परवानगीसाठी अधिकाऱ्यांचा काथ्याकूट !

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांना झापले !

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेणे हा वाद काही नवीन नाही, परंतु यावेळी राज्य सरकारने सुद्धा सपशेल दुर्लक्ष करीत महाराष्ट्राचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला तरी त्यांनी बघ्याची भूमिका स्विकारली यावर आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.वेदांता-फॉक्सकॉनने (Vedanta Foxconn Semiconductor) गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प इतक्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्रात येणार होता परंतु आता थेट तो गुजरातमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे सदर बाब निदर्शनास आणून देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ठाकरे यांनी ही समोर आणली आहे.

दरम्यान पोस्टमध्येच आदित्य ठाकरे यांनी या सेमीकंडक्टरच्या या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा देत या प्रकल्पामुळे विकासाचा नवा मार्ग सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्राला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारे राज्य तयार करण्याचे प्रयत्न केले होते असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. खरंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात सुरू करण्याचा विचार होता परंतु सदर प्रकल्प वेदांता समूह-फॉक्सवेगन अहमदाबादजवळ सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही पण पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या. प्रशासनावर असेल, कायदा सुव्यवस्थेवर असेल कोणाचा अंकुश दिसत नाही आहे म्हणून या गोष्टी होत आहेत. माझी हीच विनंती राहील खोके सरकारला थोडं पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करण खोके गुंड गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल असे म्हणून त्यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणं हे चांगलच आहे. तरी देखील या प्रोजेक्टसाठी एक वर्षात अनेक बैठका घेऊन अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रोजेक्ट येईल अशी काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. तेच पुढे नेत असताना मागच्या महिन्यात आम्ही बघितलं की या खोके सरकारने देखील आमच्याच कामावर पुढे केलेलं आणि महाराष्ट्राला आश्वासन केलेलं की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार आहे. तरीदेखील आज ही बातमी वाचून थोडा धक्का बसला आहे की हा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे, असे म्हणून आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे आदित्य ठाकरे म्हणतात, कोणत्याही ही राज्यात गेले त्याचे दुःख नाही तरी देखील आपल्या राज्यात आलं कसं नाही हे प्रोजेक्ट हे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून महाविकास आघाडी सरकारने एवढं सगळं पाठबळ देऊन हा प्रोजेक्ट इथ आला नाही. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर असेल, कायदा सुव्यवस्थेवर असेल कोणाचा अंकुश दिसत नाही आहे म्हणून या गोष्टी होत आहेत असे म्हणून आदित्य ठाकरेंनी कडाडून नव्या सरकारचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदाव, इतर मदतीचे आमिष दिल्याचे वृत्त समोर आले आहे, परंतु याबाबत अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. दरम्यान महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 कोटीचा प्रोजेक्ट गुजरातने पळवल्याने विरोधक राज्य सरकारला धारेवर धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी