29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रईडीची धमकी देणार्‍या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या - राष्ट्रवादी काँग्रेस

ईडीची धमकी देणार्‍या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या – राष्ट्रवादी काँग्रेस

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, कोल्हापूर पोटनिवडणूकीत मतदारांना ईडीची धमकी देण्यापर्यंत भाजपची मजल गेली असून जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी. Mahesh Tapase says show your place to BJP threatening ED

कोल्हापूर पोटनिवडणूकीत पेटीएमद्वारे मतदारांना पैसे दिले जातात असा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला असून हा आरोप चुकीचा, बिनबुडाचा व तथ्यहिन असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

भाजपला पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय दिसत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत असेही महेश तपासे म्हणाले. Mahesh Tapase says show your place to BJP threatening ED

हे सुध्दा पहा: 

सार्वजनिक हिताच्या कुठल्याच कामाला पवारसाहेबांना कंटाळा येत नाही हे कदाचित सदाभाऊ खोतांना माहित नसावे

प्रभाकर साईलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता, सीआयडी चौकशी करा; राष्ट्रवादीची मागणी

बाई वाड्यावर या पलीकडचे निळु फुले !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी