33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमाण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थांचा सुळसुळाट

माण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थांचा सुळसुळाट

टीम लय भारी

सातारा: जिल्ह्यातील माण तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. दलालांची एक टोळीच दहिवडी शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असताना दिसून येत आहे. अनेक तास तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उभे राहून देखील अधिकारीकडे गेल्यास कामच होत नाही. तर दलालांच्या माध्यमातून काही तासातच काम होऊन जाते (Man Tehsildar office in Satara district see agents dominance).

शिधापत्रिका, घरकुल योजना, विधवा पेन्शन योजना, अपंग वेतन, कृषी विभाग आणि तहसील कार्यालयात विविध कामासाठी खेड्यातील नागरिक येत असतात. मात्र या योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहितीच नागरिकांना नसते. आणि अधिकारी वर्गाला विचारावे तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात.

हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपामध्ये आलो, आता चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते

अनिल देशमुखांनी सांगितलं चौकशीला न येण्याचं कारण

कोरोना महामारीची ताळेबंदी उठल्यानंतर प्रशासकीय कामे करण्यासाठी मान तालुक्यातील सामान्य जनता हेलपाटे घालत आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कर्मचारी हजर होण्या अगोदरच मध्यस्थी अडलेल्या नागरिकांना हेरून अतिरिक्त व जास्तीचे पैसे घेऊन कामे करत आहेत. मुख्य म्हणजे दलालांच्या माध्यमातून केलेली कामे तातडीने केली जात आहेत.

आम्हालाही दिल्लीवर गेल्यावर वाटतं आपणच पंतप्रधान होणार : संजय राऊत

Maharashtra: 33 FIRs filed for enforcing bandh through rallies and rasta roko

माण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थांचा सुळसुळाट

यामुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनवरचा विश्वास कमी होऊन दलालांवर विश्वास अधिक वाढला आहे. तसेच कोरोना महामारीमुळे सामान्य जनतेची कामे अडकून आहेत. ताळेबंदी उठल्यावर सामान्य जनता प्रशासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी बाहेर पडत आहे. परंतु, अधिकारी व कमर्चारी यांच्याशी संगनमत करून दलाल कामे मार्गी लावत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी