28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रManisha Kayande: सीमा वादावरून मुख्यमंत्र्यांना मनीषा कायंदे यांचा सवाल

Manisha Kayande: सीमा वादावरून मुख्यमंत्र्यांना मनीषा कायंदे यांचा सवाल

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकाचा असल्याचा दावा केल्या नंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त केला आहे. कर्नाटकातील ८८५ गावे अगोदर महाराष्ट्राला द्या असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्याला तीव्र विरोध दर्शवला.

यावर प्रतिक्रिया देत शिवसेना आमदार मनीषा कायंदे असं म्हणाल्या की , एकनाथ शिंदे यांनी सीमाविरुद्ध वादात शिवसेना सोबत असताना लढा दिला. तर आता तुम्ही महाराष्ट्राचे मुखमंत्री आहात यावर तुम्ही ठोस भूमिका घ्याल हवी. तुम्ही शिवसेनेत असताना ४० आमदारांना घेऊन शिवसेनेत फूट पाडली . तर आता महाराष्ट्र बाहेर ४० गावे सुद्धा घेऊन जाणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. केंद्रसरकारने यावर अजून काही तोडगा काढलेला नाही, योग्यरीत्या हस्तक्षेप केलेला नाही आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष असताना तुम्ही महाराष्ट्राच्या हिताबद्दल विचार करणार आहेत का असा संतप्त सवाल मनीषा कायंदे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी