26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्ष नेत्याविना पार पडला पावसाळी अधिवेशनाचा आठवडा

विरोधी पक्ष नेत्याविना पार पडला पावसाळी अधिवेशनाचा आठवडा

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शुक्रवारी अधिवेशनाचा पहिला आठवडा विधानसभेत विरोधी पक्ष नेता नसल्याने पार पडला. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या अनुभवी नेत्यांनी खिंड लढवत ठेवली. पण त्यांनाही काही मर्यादा असल्याचे अधोरेखित झाले. 2 जुलै रोजी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांसह नऊ आमदारांनी सरकारला पाठिंबा देत, शपथ घेतली. अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याने 53 अंदर असलेला राष्ट्रवादी पक्ष 44 वर आला.

आपोआप राष्ट्रवादीपेक्षा जास्त आमदार कॉंग्रेसकडे असल्याने ते विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रबळ दावेदार झाले. दरम्यानच्या काळात अजित पवार विरोधी पक्षनेते पद सोडून गेल्याने राष्ट्रवादीने माजी गृहमंत्री, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना पक्ष प्रतोद, विरोधी पक्षनेते केले. पण आमदारांची संख्या कमी असल्याने त्यांच्या पक्षाने या पदाचा दावा सोडला. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर कॉँग्रेसचा माणूस जाईल असे वाटत असताना अजूनही हे पद रिक्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्याने त्यांच्याकडे किती आमदार आहेत? हा पक्ष पूर्णपणे सत्तेत विलिन झाला आहे का की ही फूट आहे? किती आमदार कोणासोबत आहेत? या सर्व तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसे संख्याबळ राष्ट्रवादी कडे नसल्याने त्यांनी तो मागे घेतला. प्रसार माध्यमाशी बोलताना, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. त्यासंदर्भातील पत्रही जयंत पाटील यांनी दिलं आहे. पण विरोधी पक्षांमधल्या सर्वात मोठ्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेसने त्यावर दावा केला आहे आणि तो योग्य आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होईल. असे सांगितल्याने कॉँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच की काय, विधानसभेतील काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमचा या पदावर दावा आहे. लवकरच याबाबत वरिष्ठांकडून निर्णय घेतला जाईल. असे विधानसभेचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते.

काँग्रेसने हा दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरचा दावा सोडला असल्याचं सांगितलं.
विधानसभेतील काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमचा या पदावर दावा आहे. लवकरच याबाबत वरिष्ठांकडून निर्णय घेतला जाईल. असे कोंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते. त्यालाही बरेच दिवस उलटून गेले. दिल्लीहून नाव निश्चित झाल्यानंतर काँग्रेसची पुढची कार्यवाही होईल, अशी माहिती कॉंग्रेसकडून देण्यात आली. दरम्यान, काँग्रेसकडून यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार ही नावे विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत. पण पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप कॉंग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेता पद रिक्तच आहे.

हे सुद्धा वाचा

IAS Transfers : राधाकृष्ण विखे पाटलांची इच्छा पूर्ण झाली, तुकाराम मुंढे आले सोबतीला; राज्यातील ४१ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

अतूल भातखळकरांच्या ‘त्या’ ट्विटनंतर नाना पटोले भडकले!

डोंगराच्या कपारीत गाव वसलेले, सायकल देखील जावू शकत नाही; एकनाथ शिंदे यांनी सांगितला इर्शाळवाडीच्या काळरात्रीचा अनुभव!  

दरम्यान विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडण्याची जी काही पहिलीच वेळ नाही. जुलै 1978 मध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. त्यानंतर ऑगस्ट 1981 मध्ये तब्बल पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ हे पद रिक्त होते. त्यादरम्यान अधिवेशने पार पडली. पण गेल्या 22 वर्षांच्या काळात विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन पार पडले नसल्याची नोंद आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेता नसल्याने विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात हे विधिमंडळाचे विधिमंडळ नेते म्हणून विरोधी पक्षनेत्याचं काम करत आहेत. थोरात यांच्या जोडीला अशोक चव्हाण ही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी