30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर संभाजीराजेंची शरद पवारांकडे विनंती

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द झाल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीत संभाजीराजेंनी शरद पवार यांना विनंती केली (Sambhaji Raje met Sharad Pawar today and in that meeting Sambhaji Raje requested Sharad Pawar).

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असून नेमकी परिस्थिती समजून घेणार आहोत, तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार संभाजीराजे (Sambhaji Raje) गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. संभाजीराजे (Sambhaji Raje) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

हल्ला झाल्यास राज्यांनी स्वत: रणगाडे विकत घ्यायचे का, केजरीवालांचा थेट मोदींना सवाल

केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

Lakshadweep administrator’s decisions unwarranted, Sharad Pawar writes to PM Modi, seeks his removal

“तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना (Sharad Pawar) सांगितले. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली,” अशी माहिती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी दिली.

“मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे असे मी शरद पवारांना सांगितले असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा होणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल,” असे संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलही सांगितले असून त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही यावरही शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा झाली असल्याचे संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी