32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयहल्ला झाल्यास राज्यांनी स्वत: रणगाडे विकत घ्यायचे का, केजरीवालांचा थेट मोदींना सवाल

हल्ला झाल्यास राज्यांनी स्वत: रणगाडे विकत घ्यायचे का, केजरीवालांचा थेट मोदींना सवाल

टीम लय भारी

नवी दिल्ली :-  कोरोनाचा प्रादुर्भाव अजून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्लीत आजपासून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन अभियान सुरू झाले आहे. त्यानुसार आता दिल्लीकरांना त्यांच्या कारमध्ये बसूनच कोरोना लस (Vaccine) दिली जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हस्ते ड्राईव्ह इन लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत केजरीवालांनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला. जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारला विचारला (This question was asked by Arvind Kejriwal to the Central Government). 

केजरीवालांचा केंद्रावर घणाघात

केंद्र सरकार आजही कोरोना संकटात गंभीर नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला. तुमचे तुम्ही लसीची (Vaccine) सोय करा असे केंद्राने राज्यांना सांगितले आहे. लसींबाबत (Vaccine) अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे, पंरतु अजूनही कोणत्याही राज्याला एक लसही (Vaccine) मिळवता आली नाही. लस (Vaccine) बनवणाऱ्या कंपन्या केंद्र सरकारकडे (Central Government) बोट दाखवत आहे. सर्व टेंडर फेल होत आहेत. मग अशा परिस्थितीत राज्यांनी करायचे काय? केंद्र सरकार (Central Government) देशासाठी लस का खरेदी करत नाही? असा सवाल अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) विचारला.

केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

टूलकिटप्रकरणाबाबत भाजपवर राष्ट्रवादीची टीका

‘If Pakistan attacks, would states defend themselves?’ Delhi CM questions India’s Covid vaccine plan

टीम इंडिया बनून काम करणे गरजेचे

सध्याच्या परिस्थितीत टीम इंडिया बनून काम करणे गरजेचे आहे. जर युद्धासारखी परिस्थिती असेल तर त्यावेळी तुम्ही राज्यांना तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणाल का? जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध छेडले तर तुम्ही राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) विचारला.

ही वेळ भारताला एकत्र येऊन काम करण्याची आहे, टीम इंडिया म्हणून या संकटाला तोंड द्यायला हवे असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री शिपायाप्रमाणे लढा देत आहेत, मात्र केंद्राचे काम आम्ही कसे करु, असे ही अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) नमूद केले.

कोरोनाविरुद्ध आपली लढाई सुरु आहे. या युद्धावेळी सर्व राज्यांनी आपआपले बघावे असे म्हणून शकत नाही. पाकिस्तानने युद्ध केल्यास उत्तर प्रदेशने तुमचे रणगाडे खरेदी करा, दिल्लीने आपआपली हत्यारे खरेदी करा असे म्हणणार का, असा हल्लाबोल अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी