27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबंडोपंतांच्या गोटातून परत आलेले आमदार खोटं बोलत असल्याचा तानाजी सावंत यांचा आरोप

बंडोपंतांच्या गोटातून परत आलेले आमदार खोटं बोलत असल्याचा तानाजी सावंत यांचा आरोप

 

टीम लय भारी

मुंबई : बंडोपंतांच्या गोटातून परत आलेले आमदार कैलास पाटील खोटं बोलत असल्याचा आरोप तानाजी सावंत यांनी केला आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून मुंबईला परत आलेले शिवसेनेचे आमदार खोटं बोलत असल्याचा आरोप तानाजी सावंत यांनी केला. मात्र कैलास पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना आपण खरं बोलत असल्याचा दावा केला आहे.

कैलास पाटील सांगतात की, मी ज्या ट्रक मधून आलो. त्या ट्रकचा नंबर माझयाकडे आहे. मी
चार किमी पावसात चालत आलो. दुचाकी आणि टकच्या मदतीने प्रवास करुन मी दहिसर चेक नाका गाठला. त्यानंतर साहेबांनी पाठवलेल्या गाडीतून मुंबईत पोहोचलो. मी आलो तो ट्रक मुराबादचा होता. त्या गाडीच्या चालकाचा तसेच क्लिनरचा मोबाईल नंबर माझयाकडे आहे. मी ज्या टोळ नाक्यावरुन आलो. त्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज देखील तुम्ही तपासून शकता.

मी दिशाभूल करत नाही. मी सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत नाही, असे कैलास पाटील यांनी सांगितले.
तर तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, कैलास पाटील मला म्हणाले, आपण
ठरलयं तिकडे जावू या. त्यानंतर गाडी गुजरातच्या दिशेने निघाल्यावर त्यांचे मत परिवर्तन झाले. ते म्हणाले की, मला भीती वाटते आहे. आपण मुंबईला परत जावू या. त्यानंतर मी त्यांना माझी गाडी देत होतो. परंतु ते माझी गाडी न घेताच परत निघाले. आम्ही दोघे सोबत प्रवास करीत होतो. त्यावेळी त्याला सतत कोणाचे तरी फोन येत होत. ते मोबाईलवर सतत बोलत होते. त्यांना मोबाईलवर सारखे मॅसेज येत होते. दोघांच्या पत्रकार परिषद विचारात घेता नक्की कोण खरं बोलतयं हा संशोधनाचा विषय बनला आहे.

 

हे सुद्धा वाचा : AUDIO CLIP : अबब ! फुटलेल्या आमदाराला 50 कोटीची ऑफर, ऑडीओ क्लिप व्हायरल

EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार ; अजित पवारांनी सरकारी गाडी सोडली

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी