29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी हटाव देश बचाव, पृथ्वीराज चव्हाणांचा सायकल रॅलीत नारा

मोदी हटाव देश बचाव, पृथ्वीराज चव्हाणांचा सायकल रॅलीत नारा

टीम लय भारी

मुंबई :- मोदी सरकारच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य जनेतला अतिशय त्रास सहन करावा लागत आहेत. इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंधन दर वाढीच्या विरोधात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराड येथे सायकल रॅली काढण्यात आली आहे. यावेळी मोदी हटाव देश बचाव असा नारा पृथ्वीराज चव्हाण यांनी या सायकल रॅलीत दिला आहे (Modi Hatav Desh Bachao, Prithviraj Chavan slogan in the cycle rally).

या सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागली आहे. या मोदी सरकारला सर्वसामान्यांची काहीही काळजी नाही आहे. इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. कराडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली आहे (A signature campaign has also been launched against petrol-diesel price hike).

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, सरकारी मालमत्ता विकून कारभार हाकण्याचे काम सुरु ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली आहे. देश चालवण्यात मोदी सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीचा बोजा टाकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले असल्याची घणाघाती टीका चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे (Chavan has sharply criticized the Modi government for breaking the shackles of the common man).

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पार कराडमध्ये इंधन दरवाढीविरोधात पार पडलेल्या सायकल रॅलीत अॅड. उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मनसे सोबत युतीवर फडणवीसांचे सूचक विधान

Nana Patole: Maharashtra Congress’s man of the moment

Modi Hatav Desh Bachao Prithviraj Chavan slogan cycle rally
पृथ्वीराज चव्हाण

यानंतर चव्हाण म्हणाले, 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ‘मोदी हटाव देश बचाव’ असा नारा आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून देत आहोत. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना 124 डॉलर प्रति बॅरलप्रमाणे कच्च्या तेलाचे दर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर 60 ते 65 डॉलर प्रती बॅरल असे दर असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य लोकांवर कर लादून स्वतःच्या झोळ्या भरण्याचे काम करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला आहे.

मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालीय. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत. युपीए सरकारच्या कार्यकाळात 1-2 रुपयांची जरी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत. असे असूनही केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी