28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : शेतकरी, कामगारांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढत आहेत;...

Bharat Jodo Yatra : शेतकरी, कामगारांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढत आहेत; राहुल गांधी यांचा घणाघात

स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी, कामगार यांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देऊन टाकतात पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, असा घणाघाती हल्ला खासदार राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला.

हा देश तपस्वींचा आहे, महापुरुषांबरोबरच शेतकरी, कष्टकरी हेसुद्धा तपस्या करत आहेत पण मोदींच्या राजवटीत त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी, कामगार यांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देऊन टाकतात पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, असा घणाघाती हल्ला खासदार राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला.

यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, नोटबंदींचा निर्णय चुकला तर मला चौकात फाशी द्या असे मोदी म्हणाले, डोळ्यात अश्रूही आले पण नोटबंदी अपयशी ठरली, काळा पैसा संपला का ? पंधरा लाख रूपये आले का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत. पंधरा लाख जसे गायब झाले तसेच हे उद्योगही गायब झाले.
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देशात आज द्वेषाचे बिज पेरले जात आहे. समाजा-समाजात, जाती धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. देशातला तरुण नोकरीसाठी भटकत आहे पण मोदी सरकार त्यांना नोक-या देत नाही. काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय भाजपाचा दिवसच जात नाही. सकाळ झाली की त्यांचा दिवस शिव्यानेच सुरू होतो. तुम्हाला शिव्या देणारे हवे आहेत का देशाची सेवा करणारे हवे आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, देशासाठी लढणारा गांधी परिवार आहे. या कुटुंबाने देशासाठी दोन बलिदान दिली आहेत. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून तरुणांना नवा संदेश दिला आहेत.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महात्मा गांधींच्या दांडी यात्रेवरही टीका केली होती पण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला व क्रांती घडली. भारत जोडो यात्राही क्रांती घडवेल. स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, आव्हानांना न डगमगता थेट भिडणारे नेते राहुल गांधी आहेत. देशातील आजची राजकीय परिस्थिती गंभीर आहेत, गलिच्छ राजकारण सुरू असून राजकीय स्तर खालावला आहे. विरोधकांचे गळे कापण्याचे काम केले जात आहे. देशात अनेक समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी प्रचंड मोठी समस्या आहेत. सामान्य जनता भरडली जात आहे, पण त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही.
हे सुद्धा वाचा :
VIDEO : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Uddhav Thackeray : ‘त्याला पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं’; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

VIDEO : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, या देशात वर्षानुवर्षापासून विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत, गंगा जमुना तहजीब देशात होती पण 2014 पासून चित्र बदलले असून गंगा जमुना तहजीबला नख लावण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्राला थोर समाजसुधारक व महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राला एक विचार आहे, संस्कृती आहे. 2014 नंतर नवा भारत उदयास आला आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहेत.
यावेळी राहुल गांधी यांचा शेतकरी फेटा बांधून व बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोंगडं, काठी तसेच संविधान व विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

आजच्या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते के. सी वेणुगोपाल, खासदार दिग्विजयसिंह, जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी