29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रThane Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहरात हत्येच्या घटनांनी उडाली खळबळ

Thane Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहरात हत्येच्या घटनांनी उडाली खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या शहरात झालेल्या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे शहरातील नौपाडा आणि येऊर या परिसरात या हत्येच्या घटना घडल्या. या हत्येच्या घटना घडल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) या शहरात झालेल्या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे शहरातील नौपाडा आणि येऊर या परिसरात या हत्येच्या घटना घडल्या. या हत्येच्या घटना घडल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परंतु या दोन्ही परिसरात घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर बारा तासात पोलिसांनी या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक देखील करण्यात येत आहे. ठाणे शहरात घडलेल्या एका घटनेत शहरातील कुख्यात गुंड गणेश जाधव याचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. ठाण्यात घडलेल्या या दोन्ही घटनेचे आरोपी हे एकच असल्याची धक्कादायक माहिती ठाण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील नौपाडा आणि येऊर या परिसरात गोळीबाराच्या घटना घडल्या. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरज मेहरा, विपीन मिश्रा आणि सौरभ शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाण्यात घडलेल्या गोळीबाराच्या पहिल्या घटनेमध्ये नौपाडा येथील घंटाळी परिसरामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास याठिकाणी एका रिक्षामधून तीन जण आले. या तिघांनी येथील बांधकाम व्यावसायिक बाबा माने यांच्या कारची काच फोडली. परंतु या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी आरडाओरड केल्याने त्यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. पण काही वेळातच पुन्हा तिघे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि याचवेळी या आरोपींनी घंटाळी परिसरात असलेल्या दुकानात काम करणाऱ्या अश्विन गमरे याच्या छातीवर गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला.

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Sanjay Raut Bail : राऊतांची दिवाळी अंधारातच! जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित

Ashok Chavhan : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी

या घटनेनंतर आरोपींनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील येऊर वनक्षेत्रात कुख्यात गुंड गणेश जाधव याच्या डोक्यात आणि मानेवर गोळी झाडली. दरम्यान, या घटनेनंतर गणेश जाधव याला रुग्नालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान गणेश जाधव याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर मात्र ठाण्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. सदर घटना घडल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि नौपाडा पोलिसांकडून या घडलेल्या घटनांचा तपास सुरु करण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या तपासात विपीन मिश्रा आणि सौरभ शिंदे यांना पोलिसांनी मुलुंड येथून ताब्यात घेतले. तसेच नौपाडा पोलिसांनी सुरज मेहरा याला अटक केली. या तिन्ही आरोपींनी हत्या केलेल्या कुख्यात गुंड गणेश जाधव याच्यावर मारहाण, खुनाचा प्रयत्न व इतर असे २६ गुन्हे दाखल आहेत. गणेश जाधव आणि त्याची हत्या केलेल्या तिन्ही आरोपींची कारागृहात ओळख झाली होती. दरम्यान, त्यांच्या आपापसांतील वादामुळे या तिन्ही गुन्हेगारांनी गणेश जाधव याची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी