38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रदेशाचे सार्वभौमत्व व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संघर्ष करू : नाना पटोले

देशाचे सार्वभौमत्व व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संघर्ष करू : नाना पटोले

टीम लय भारी

शिर्डी : उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिर्डी (Nana Patole) येथे दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा होत आहे.(Nana Patole Said We will fight to democracy of country)

दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार असून एक व्यक्ती एक पद यांसह काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे(Nana Patole) अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरातील सर्व योजनांची अंमलबजावणी सह्याद्रीच्या कुशीत (Nana Patole) आणि साईबाबांच्या पवित्र भूमीत असल्या शिर्डी शिबिरातून होत आहे. असे नाना पटोले म्हटले.

या कार्यशाळेत राजकीय, सामाजिक, कृषी, ग्रामीण असे सहा विभाग करण्यात आले असून या सर्व क्षेत्रातील धोरणांवर काँग्रेसचे प्रभारी एच.के .पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व प्रमुख (Nana Patole) पदाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा होत असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :- 

All 4 MVA nominees will win RS polls: Maha Cong chief Patole

सोनियाजींनी ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी : बाळासाहेब थोरात

सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी