29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich water) थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.(Chemical-rich water from the drainage at Shivajinagar goes straight into the lake; Hundreds of fish deaths)

गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज लाइन फुटल्याने पाणी थेट शिवाजीनगर येथील तलावात मिसळल्याने तलावातील पाणी प्रदूषित होऊन शेकडो माशांसह अन्य जलजीव मृत्यू पडल्याची घटना समोर आली आहे.

पर्यावरण राखण्यासाठी शिवाजीनगर येथील फाशीच्या डोंगरालगत पर्यावरण संस्था व नगरसेवक दिनकर पाटील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाबरोबर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.शेकडो मासे कशामुळे मृत पावले, यांची चौकशी करण्याची मागणी मच्छीमारी करणारे नागरिकांनी केली आहे, वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाइन टाकली होती. पण वीस वर्षांनंतर या भागात लोकवस्ती वाढ झाली़ पण ड्रेनेज लाइन मात्र तीच आहे. ड्रेनेजचे पाणी वाहून नेणारी लाइन मात्र कमी पडत आहे. त्यामुळे ड्रेनेज फुटण्याचेही प्रमाण वाढले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी