30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमोठी बातमी : वरिष्ठ अधिकाऱ्याला जिवंत जाळणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा

मोठी बातमी : वरिष्ठ अधिकाऱ्याला जिवंत जाळणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा

आपल्याकडे अनेक प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. या धंदयांचे अनेक प्रकार आहेत. विविध मार्गानी लोक काळा पैसा मिळवतात. गैर व्यवहार करतात.

आपल्याकडे अनेक प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. या धंदयांचे अनेक प्रकार आहेत. विविध मार्गानी लोक काळा पैसा मिळवतात. गैर व्यवहार करतात. त्यात पेट्रोल, रॉकेल, डिझेल विक्रीचा देखील समावेश आहे. आशा प्रकारे अवैध पेट्रोलची विक्री करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी करण्यात आला होता. यावेळी तीन जणांनी त्या अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घातली. त्यानंतर त्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाला दिला आहे. या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याचा निकाल तब्बल 11 वर्षांनी लागला आहे.

मोठी बातमी : वरिष्ठ अधिकाऱ्याला जिवंत जाळणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा

यशवंत सोनावणे असे त्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. त्या हत्याकांडाचा आज निकाल लागला. मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय.गोंड यांनी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मच्छिंद्र सुरवडकर, राजू शिरसाट, अजय सोनवणे अशी त्या तीन आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात एकूण पाच आरोपींचा समावेश होता. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक अल्पवीयीन होता. त्याच्यावर बाल न्यायालयात खटला सुरू आहे. 25 जानेवारी 2011 रोजी ही घटना घडली होती. छापेमारीसाठी गेलेले अधिकारी सोनावणे यांना जाळून मारण्याचा या तिघांनी प्रयत्न केला होता.

हे सुद्धा वाचा

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’चा सोशल मीडियावर जलवा

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांसाठी भन्नाट उपक्रम!

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

जिल्हयात अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरु आहेत. मग ते रेशन संबंधीत आहे. रेती व्यवसाय, तसेच रॉकेल, पेट्रोल, डीजेल अशा अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये मोठया प्रमाणात गैर व्यवहार होता. जर एखादा प्रमाण‍िक अध‍िकारी चौकशीसाठी गेला तर हे लोक त्यांच्यावर हल्ला करतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी