27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्यायला पाणी नाही, पिके करपून चालली; उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून ...

प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली; उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून ऐकल्या व्यथा

पावसाने गेल्या काही दिवसात दडी मारल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. पावसाळ्यात ही अवस्था असताना राज्य सरकार मात्र ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून चमकोगिरीची हौस भागवून घेत आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य गावांना भेटी देत आहेत. ‘साहेब प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली, शिर्डी विमानतळासाठी जमिन्या दिल्या, मात्र गावचा विकास नाही,’ अशा व्यथा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी मांडल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देत तसेच विद्यार्थ्यांकडून शिदोरी घेत दुष्काळ दौरा केला.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दुष्काळी दौऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

इथल्या स्थानिकांनी, शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना हेच सांगितलं की, ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम आमच्याच गावात झाला, पण आमच्या गावाला कोणतीही मदत मिळाली नाही. आतापर्यंत पीक विमा कंपन्या असो किंवा सरकार असो सर्वांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले.’ उद्धव ठाकरे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिर्डी जवळच्या काही गावांमध्ये गेले. दरम्यान आज काही भागात रिमझिम पाऊस सुरु झाला आहे, तरी या पावसाचा कोणताही सकारात्मक परिणाम पिकांवर होऊ शकणार नाही. पीक नव्याने उभं राहणे अशक्य असल्याचं शेतकऱ्यानी सांगितले.
हे सुद्धा वाचा
आवाज वाढीव डीजे तुझ्या… पुण्यात डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी
गृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार शिल्पा शेट्टी; ‘सुखी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचं एकमेकांना आव्हान!

उद्धव ठाकरे हे यांनी अनेक भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. याचबरोबर संगमेनरतालुक्यातील तळेगाव येथे दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द गावातील शेतीची पाहणी केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना, घटनाबाह्य सरकार जिल्ह्यात सभा घेतंय, पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घटनाबाह्य सरकारकडे तोडगा नाही. पण शिवसेना नेहमी बळीराजासोबत आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे लवकरात लवकर शासन दरबारी न्याय मिळावा, दुष्काळ जाहीर होऊन मदत मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही

‘नाशिक विभागात सरासरीच्या खूपच कमी पाऊस पडलेला आहे. अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे पीकही धोक्यात आली आहेत. पाणीसाठा आटू लागला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे, अनेक मोठमोठ्या धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जलसाठा उपलब्ध नाही. पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणीही धीर सोडू नका, काळजी करु नका…

उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील काकडी गावातील बाजरी, सोयाबीन शेतीची आज पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. ‘कोणीही धीर सोडू नका, काळजी करू नका, काही दिवसांनी परत येतो,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी देत निरोप घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी