28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधानांचं निवासस्थान, नव्या संसद भवनाचं काम पुढे ढकला, पवारांचा टोला

पंतप्रधानांचं निवासस्थान, नव्या संसद भवनाचं काम पुढे ढकला, पवारांचा टोला

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पंतप्रधानाचे निवासस्थाना आणि नव्या संसद भवनाचे काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष द्या असा टोला रोहित पवारांनी अतुल भातखळकर यांना लगावला आहे (Rohit Pawar has asked Atul Bhatkhalkar to postpone the work of the Prime Minister’s residence and the new Parliament building and focus on vaccination).

आमदारांच्या हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने टेंडर काढले आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भातखळकरांनी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि नव्या संसद भवनाचे काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा आणि केंद्राला लसीकरणाकडे लक्ष देण्यास सांगावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे (Such a toll has been imposed by Rohit Pawar).

पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका, चव्हाणाचं फडणवीसांना प्रत्युत्तर

दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’चं कौतुक; मुंबईकरांनी कोरोनाला कसं हरवलं?

Covid-19: Why India should vaccinate refugees and undocumented immigrants as well

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करून अतुल भातखळकर यांना हा टोला लगावला आहे. अतुल भातखळकरजी आपला मुद्दा मला योग्य वाटतो, पण टेंडर काढले म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असे नाही. टेंडर ते कामाचे बील देणे याला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीतच असेल! आमदार निवासाचे म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचे आहे. तरीही मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. तुम्हीही 22 हजार कोटींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि 13 हजार कोटींचे पंतप्रधान निवासस्थानाचे काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल, असा चिमटा रोहित पवारांनी (Rohit Pawar) काढला आहे.

सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात! मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?, असा सवालही रोहित पवारांनी ((Rohit Pawar) केला आहे.

भातखळकर काय म्हणाले होते?

यापूर्वी भातखळकर यांनी ट्विट करून एमएलए हॉस्टेलच्या मुद्द्यावरून रोहित पवारांवर (Rohit Pawar) टीका केली होती. MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवारांच्या (Rohit Pawar) नजरेतून हे सुटलेले दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावे. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना, अशी टीका भातखळकर यांनी केली होती. त्याला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी