29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली...

संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली प्रगती करु शकतात

टीम लय भारी 

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एक पत्रकार असूनही संजय राऊत यांनी अल्पावधीत कोट्यवधीची संपत्ती कमविली त्यामुळे माझी राऊत यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या यशाचे गमक इतर पत्रकारांनाही सांगावे. जेणेकरुन महाराष्ट्रातील पत्रकारही आपल्यासारखी चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती करु शकतात. Pravin darekar criticize Sanjay Raut

दरकेर म्हणतात, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईने भाजपला आनंद व्हायचे काही कारण नाही. संजय राऊत यांना नेहमीच मोदी साहेब यांच्यापासून भाजपच्या नेत्यांवर व देवेंद्रजी यांच्यावर टीका करताना आनंदाच्या उकळ्या कशा फुटायच्या त्याची त्यांनी आठवण करावी. भाजपला काही उडया मारायचे कारण नाही. कारण हा विषय भाजपचा नाही तर एका तपास यंत्रणेचा विषय आहे, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले. Pravin darekar criticize Sanjay Raut

आज ईडीने संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केल्या. त्यावर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलतना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले की, ईडीसारखी तपास यंत्रणा जेव्हा कारवाई करते, त्या वेळी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे सोर्स, उपलब्ध असणारी संपत्तीची माहिती आणि पैशाचा काही गैरव्यवहार झालाय का, याची चौकशी होत असते. म्हणून संजय राऊत यांच्या या संपत्तीसंदर्भात ईडीने कारवाई केली असावी.

अलिबागची एक एकरची जागा फक्त एक कोटीची असेल, तसेच आपल्यावरील कारवाई म्हणजे मराठी माणसावर कारवाई करायची अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली त्यावर दरेकर यांनी सांगितले की, पत्रकार म्हणून अलिबाग येथे कोट्यवधीची संपत्ती तसेच दादर सारख्या भागातील एका टोलेजंग टॉवरमध्ये कोट्यवधीचा फ्लॅट म्हणजे थोडी संपत्ती नव्हे असं दरेकरांनी म्हटलं आहे.

तसेच कारवाई झाल्यावर मराठीच्या नावाने भावनिक साद घालणे चुकीचे आहे. कारण मराठी म्हणजे तुम्ही नाही, महाराष्ट्र म्हणजेही तुम्ही नाही, हे अनेकदा आम्ही सांगितले आहे. परंतु आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्रीयन असे चित्र उभे करायचे. अशी विधाने ते  नेहमीच करतात असं दरकेर यांनी म्हटले आहे. Pravin darekar criticize Sanjay Raut

हे सुध्दा पहा: 

False declaration case: BJP leader Pravin Darekar reaches Mumbai police station to record statement

पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार पण राज्य सरकार या गोष्टीचा ‘पराचा कावळा’ करू पाहत आहे : प्रवीण दरेकर

संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी