28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडा'मी मेलो तरी माझा आत्मा इथं भटकत राहिल', आर अश्विनचं विचित्र वक्तव्य

‘मी मेलो तरी माझा आत्मा इथं भटकत राहिल’, आर अश्विनचं विचित्र वक्तव्य

भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर अश्विन(R Ashwin) सध्या त्याच्या विचित्र वक्तव्यामुळं चर्चेत आला आहे. 'मी मेलो तरी माझा आत्मा इथं भटकत राहिल', असं वक्तव्य अश्विननं केल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. तर त्याने हे वक्तव्य चेन्नईतील चेपॉक स्टेडियमबाबत बोलताना केलं आहे. आर अश्विन(R Ashwin) याने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी केली. आयसीसीने अश्विनला त्याने केलेल्या कामगिरीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. अश्विन नंबर 1 बॉलर ठरला आहे. दरम्यान तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने(TNCA) त्याचा विशेष गौरव केला. यावेळी अश्विन बोलत होता.

भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर अश्विन (R Ashwin) सध्या त्याच्या विचित्र वक्तव्यामुळं चर्चेत आला आहे. ‘मी मेलो तरी माझा आत्मा इथं भटकत राहिल’, असं वक्तव्य अश्विननं केल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. तर त्याने हे वक्तव्य चेन्नईतील चेपॉक स्टेडियमबाबत बोलताना केलं आहे. आर अश्विन (R Ashwin) याने इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी केली. आयसीसीने अश्विनला त्याने केलेल्या कामगिरीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. अश्विन नंबर 1 बॉलर ठरला आहे. दरम्यान तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA) त्याचा विशेष गौरव केला. यावेळी अश्विन बोलत होता.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर त्याचे प्रेम वेगळ्याच पातळीवर आहे. अश्विन (R Ashwin)तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडूनही खेळताना दिसतो. या स्टेडियममध्ये तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनची T20 लीग देखील खेळली जाते आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अश्विन या मैदानात उतरतोच. अश्विनने 500 टेस्ट विकेट आणि 100 कसोटी पूर्ण केल्याबद्दल असोसिएशनने त्याचा गौरव केला. यावेळी अश्विनने माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाला अश्विन?

“या जागेने मला इतकं दिलं आहे की मला इथे पुन्हा पुन्हा यायचं आहे. लोक विचारत राहतात की तुला परत का जायचं आहे?”, “मी उद्या जिवंत नसेन, पण माझा आत्मा या ठिकाणी भटकत राहिलं. माझ्यासाठी या जागेचा अर्थ असाच आहे.” असं वक्तव्य यावेळी अश्विनने (R Ashwin)केलं आहे.

माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी सहसा शब्दांचा शोध घेत नाही. मी येथे आल्याबद्दल खरोखर नम्र आणि कृतज्ञ आहे.” अशी भावना अश्विनने यावेळी व्यक्त केली.

‘तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही…’, मुंबईच्या खेळाडूंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अश्विनची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप

आर अश्विन (R Ashwin) याने इंग्लंड विरुद्ध या कसोटी मालिकेत 500 विकेट्सचा टप्पा गाठला. तसेच अश्विन धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळला. अश्विनने या 100 व्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. अश्विन यासह टीम इंडियाकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. अश्विनने अनिल कुंबळेचा 35 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडून काढला. अश्विनला आता कामगिरीचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. आर अश्विन टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये नंबर 1 ठरला आहे.

सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो

आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा केन विलियमसन पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर जो रुट दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि स्टीव्ह स्मिथ चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला 5 स्थांनाचा फायदा झालाय. रोहित 10 व्या वरुन पाचव्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. धर्मशालेत इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत शतक ठोकल्याचा फायदा रोहितला रँकिंगमध्ये झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी