29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट कधी? राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत दिली महत्वाची माहिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट कधी? राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत दिली महत्वाची माहिती

टीम लय भारी

मुंबई:- राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. दररोज कोरोना रुग्णांची संख्या नवे रेकॉर्ड बनवत आहे. अशात आता महामारीबाबत हे नवीन वर्ष 2022 कसं असणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.( Rajesh Tope gave important information about the third wave)

सध्या वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही अजून वाढेल आणि ती जानेवारी अखेरीस उच्चांग गाठेल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पडळकरांना पवार साहेबांची अॅलर्जी का?, भुजबळांचा सवाल

Maharashtra Corona, omicron : कोरोनाचा आकडा 26 हजारांच्या पार, तर ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण

राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचं आहे. आज आपण बघतो आहोत की काल ४५ हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? जसं दुसऱ्या लाटेत दररोज ६५ हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता.

तसं या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असं वाटतं. त्यानंतर तो खाली जाईल असंही तज्ज्ञांचं मत आहे”.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

Third Covid Wave Started, Will Peak By January-End: Maharashtra Minister

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असं आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असंसांगितलं.राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी