30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयपडळकरांना पवार साहेबांची अॅलर्जी का?, भुजबळांचा सवाल

पडळकरांना पवार साहेबांची अॅलर्जी का?, भुजबळांचा सवाल

टीम लय भारी

नाशिकः शरद पवार साहेबांची कोणाला अॅलर्जी असण्याचे कारण नाही. त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी गोपीळचंद पडळकरांना उत्तर दिले.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांना शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा,(Pawar Saheb is allergic to Padalkar? Bhujbal)

असा सल्ला दिलाय. खरे तर दोन महिन्यांपासून जास्त चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुढाकार घेतला. त्यांच्या विनंतीला मान देत अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यावरून पडळकर आक्रमक झाले आहेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांची पहिली प्रतीक्रीया

पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, पडळकरांचा परबांना सल्ला

काय म्हणाले पडळकर?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य करताना, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?असा सवाल केलाय. सोबतच अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं म्हटलंय.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की, मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल, याची आठवण देखील पडळकर यांनी करुन दिली. माझ्या विनंतीचा नाही, तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे आवाहन केले आहे.

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

I’m with Pawar saheb and NCP only: Chhagan Bhujbal

भुजबळांचे उत्तर

पडळकरांना छगन भजबळ यांनी नाशिकमधून मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर महाविकास आघाडीची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला, असं कोणी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याची आठवण त्यांनी पडळकरांना करून दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी