32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रRamdev Baba : बाळासाहेबांचे राजकीय वारसदार शिंदेच, रामदेव बाबांकडून प्रतिक्रिया

Ramdev Baba : बाळासाहेबांचे राजकीय वारसदार शिंदेच, रामदेव बाबांकडून प्रतिक्रिया

बाळासाहेबांचे राजकीय वारसदार शिंदेच असे म्हणून योगगुरू रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) यांनी आज आपली भावना व्यक्त केली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन येथे भेट झाली. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. भेटीनंतर आपल्या भावना व्यक्त करत असताना एकनाथ शिंदेच खरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. सदर भेट आज सकाळी दहा वाजता झाली आहे.

रामदेव बाबा यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आज लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली त्यामुळे हे भेट सत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि रामदेव बाबा यांनी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर त्या भेटीचे समाधान व्यक्त करीत रामदेव बाबा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो, असे म्हणून त्यांनी त्यांच्या भेटीचे प्रयोजन सांगितले.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बुक्यांचा मार

Teacher day: महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना मिळणार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस

VIDEO : रेल्वेखाली जीव द्यायला निघालेल्या तरूणीचे पुन्हा जुळले ‘प्रेम’

पुढे रामदेव बाबा म्हणाले, बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम होतं. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत मोठ्या विषयांवर संवाद साधला. खूप बरं वाटलं असं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर समाधान व्यक्त केले. अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांमुळे रामदेव बाबा चर्चेचा विषय ठरत असतात, परंतु यावेळी त्यांनी केलेल्या या सांकेतिक वक्तव्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

रामदेव बाबा यांनी व्यक्त केलेले मत सर्वस्वी वयक्तिक स्वरुपाचे असले तरीही शिवसेनेच्या वादात पुन्हा ठिणगी पडल्याने चित्र आणखी वेगळे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आणि भाजपशी हात मिळवणी केली परंतु संख्याबळाच्या जोरावर शिंदेगटाकडून शिवसेना खरी आमचीच असा दावा करण्यात आल्यामुळे हा वाद आणखीच चिघळला. दरम्यान रामदेव बाबा यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी