छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या वंदनीय व्यक्तींबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. कोश्यारी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी कोश्यारींच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यादरम्यान केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. (Ramesh Bais the new Governor of Maharashtra; Bhagat Singh Koshyari’s resignation accepted) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांचादेखील समावेश आहे.
President accepts resignation of Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, appoints Ramesh Bais as new governor: Official
— Press Trust of India (@PTI_News) February 12, 2023
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भगतसिंग कोश्यारी (offensive remarks against Shivaji Maharaj) यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागली होती. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल अभिभाषण करत असतात. त्यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांकडून राज्यपालांना लक्ष्य करण्यात येण्याची दाट शक्यता होती. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे विरोधी पक्षांनी स्वागत केले आहे.

देर आये दुरुस्त आये
भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे. त्या म्हणाल्या, महापुरुषांचा अपमान करण्याचे पाप कोश्यारी यांनी केले होते. “देर आये दुरुस्त आये”, उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला.
Congratulations to Hon. Shri. Ramesh Bais on being appointed as the Governor of Maharashtra.
We worked together in the Parliament for 10 years.
Best Wishes 💐
— Supriya Sule (@supriya_sule) February 12, 2023
राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री
महाविकास सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वारंवार खटके उडत होते. मविआ सरकारची कोंडी करण्याचे काम कोश्यारी यांनी केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याविरोधात त्यांनी भूमिका घेतली. संवैधानिक मार्गाने तत्कालीन सत्ताधाऱ्यांची कोंडी कारण्याची एकही संधी कोश्यारी यांनी सोडली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्याने सुमारे पाऊण तास थांबून राज्यपालांना सरकारी विमानातून खाली उरतावे लागले होते. माविआ सरकार आणि राज्यपाल यांच्यात राजकीय लपंडाव सुरु होता.
हे सुद्धा वाचा
अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? भगतसिंग कोश्यारी पायउतार होणार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र