30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्ररवी राणा 'वर्षा'वर भेटले, बच्चु कडूंबाबतच्या वक्तव्यावर दिलगिरी; बच्चु कडूंची भूमिका काय?

रवी राणा ‘वर्षा’वर भेटले, बच्चु कडूंबाबतच्या वक्तव्यावर दिलगिरी; बच्चु कडूंची भूमिका काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर या वादावर अखेर पडदा पडण्याची चिन्हे आहेत. रवी राणा यांनी मी शब्द मागे घेतो असे जाहीर केले आहे. तसेच बच्चू कडू यांच्याकडून काही अपशब्द निघाले आहेत ते सुद्धा आपले शब्द मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे, असे यावेळी रवी राणा म्हणाले.

आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री आणि आमदार बच्चु कडू यांच्यावर गुवाहाटीला जावून 50 खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राणा विरूद्ध बच्चु कडू यांच्यात वादाचा वणवा पेटला होता. या वादामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर या वादावर अखेर पडदा पडण्याची चिन्हे आहेत. रवी राणा यांनी मी शब्द मागे घेतो असे जाहीर केले आहे. तसेच बच्चू कडू यांच्याकडून काही अपशब्द निघाले आहेत ते सुद्धा आपले शब्द मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे, असे यावेळी रवी राणा म्हणाले.
मागील काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चु कडू यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. शिंदे गटासोबत शिवसेनेतून त्यावेळी बाहेर पडलेले विद्यमान पाणीपूरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील राणा यांनी शब्द मागे घ्यावेत तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे म्हटले होते. दरम्यान बच्चु कडू यांनी देखील आमदार राणा यांना पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. अखेर आमदार रवी यांना यांना काल मुख्यमंत्री, उपमुख्यंमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईत बोलावले, काल आणि आज देखील त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दोन्ही माझे नेते आहेत. त्यांनी काल मला बोलावले आमच्यात एकुण साडेतीन तास वर्षा निवासस्थानी बैठक झाली. अमरावती जिल्ह्यात बच्चु कडू आणि मी दोघे ही आमदार आहे, आम्ही दोघेही सरकारसोबत आहोत, जेव्हा एखाद्या मुद्द्यावरू मतभेद होतात. आम्ही दोघे ही सरकारसोबत आहोत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जे कोणी आहेत, ते आम्ही सर्वचजण सहकारी आहोत. असे सांगतानाच ते म्हणाले, या वादावर पडदा पडलेला आहे.
हे सुद्धा वाचा :
Gujarat Morbi Bridge Collapse : इंग्रजांनी बांधलेला 140 वर्ष जूना पूल भाजप सरकारने 5 दिवसांत पाण्यात घातला
Nitin Gadkari : गडकरी म्हणतात दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; पुढची निवडणूक लढण्याबाबत म्हणाले…
NCP Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे जयंत पाटील यांनी सांगितले कारण

देवेंद्र फडणीस हे माझे नेते आहेत त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी माझे शब्द परत घेतो. बच्चु कडू यांच्या कडून देखील काही अपशब्द निघाले आहेत, ते देखील आपले शब्द मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे. दरम्यान यावर बच्चु कडून यांच्याकडून मात्र कोणतीही भूमिका मांडलेली नाही, कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतरच ते आपला निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी