33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमहाराष्ट्रVIDEO : रेणुका ठाकूरने मारलेल्या 'त्या' निशाण्यावर पाकिस्तानी खेळाडू घायाळ

VIDEO : रेणुका ठाकूरने मारलेल्या ‘त्या’ निशाण्यावर पाकिस्तानी खेळाडू घायाळ

भारतीय महिला क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर (Renuka Thakur) आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखली जाते. तिच्या त्या आक्रमक शैलीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना तिने कित्येकदा गारद केले आहे. १२ फेब्रुवारीला टी २० विश्वचषक सामान्यांच्या वेळी तिच्या आक्रमकपणाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यादरम्यान घडलेल्या या घटनेचा विडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड विरळ होत आहे. या सामन्यादरम्यान रेणुका ठाकूरने पाकिस्तानी फलंदाजाच्या गुप्तांगावर जोरात चेंडू फेकून मारला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची बोबडी वळली. हा विडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. (Renuka Thakur hit on private part Pakistani player got injured )

Renuka Thakur hit on private part Pakistani player got injured

पाकिस्तानच्या पहिल्या इनिंगमधील पहिल्याच षटकात ही घटना घडली आहे. भारताची जलदगती गोलंदाज रेणुका ठाकूर प्रथम गोलंदाजीची आली होती. याचवेळी पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजाला गंभीर इजा झाली. रेणुका ठाकूरच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज जव्हेरिया खान हिने सावध पवित्र घेत तो चेंडू थोपवून धरला. पण याच वेळी ती क्रीज सोडून थंडी पुढे आली होती. हे पाहताच रेणुका ठाकूरने वाऱ्याच्या वेगाने पुढे येत चेंडू पकडत एक क्षणही न वाया घालवता जोरात तो चेंडू यष्टींवर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू स्टंपवर न लागता जोरात जव्हेरिया खानच्या गुप्तांगावर जाऊन आदळला. अनपेक्षित झालेल्या या माऱ्याने जव्हेरिया खानला प्रचंड वेदना होऊ लागल्या तीने हातातील बॅट तिथेच सोडून दिली आणि ती लंगडत चालू लागली. हा थरारक प्रसंग समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

विमेन्स प्रिमियर लीगमध्ये 87 खेळाडूंचा लिलाव; वाचा कोणत्या फ्रंचायझीमध्ये कोणता महिला खेळाडू

VIDEO : अदानी गो बॅक, स्टॉप अदानी; हिंडेनबर्ग अहवालानंतर का व्हायरल होताहेत फोटो, व्हिडिओ, जाणून घ्या सत्य

महिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही; हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी