33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : अदानी गो बॅक, स्टॉप अदानी; हिंडेनबर्ग अहवालानंतर का व्हायरल होताहेत...

VIDEO : अदानी गो बॅक, स्टॉप अदानी; हिंडेनबर्ग अहवालानंतर का व्हायरल होताहेत फोटो, व्हिडिओ, जाणून घ्या सत्य

ऑस्ट्रेलियात अदानींच्या विरोधातील असंतोष काही नवा नाही. ऑस्ट्रेलियातील कार्मायकेल खाणीच्या विरोधात हजारो ऑस्ट्रेलियन नागरिकांचा संघर्ष गेली 5 वर्षे सुरू आहे. मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन आणि केर्न्स येथे आंदोलकांनी मोर्चे काढले होते. 15,000 शालेय विद्यार्थ्यांनी हवामान बदलावर सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध निदर्शने केली होती. पर्यावरणवादी व नागरिकांच्या रेट्यापुढे झुकून अदानीला या वादग्रस्त प्रकल्पाचा आकार आणि व्याप्ती कमी करावी लागली होती. तरीही ब्रिस्बेनमध्ये, शेकडो निदर्शकांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अदानीच्या मुख्यालयाबाहेर धरणे दिली होती.

सोशल मीडियात अदानी गो बॅक, स्टॉप अदानी असे अनेक फोटो, व्हिडिओ हिंडेनबर्ग अहवालानंतर व्हायरल होता आहेत. (Adani Go Back, Stop Adani) हे फोटो, व्हिडिओ आताच का व्हायरल होत आहेत, काय आहे यामागील सत्य ते जाणून घ्या…

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ऑस्ट्रेलियातील नागरिक रस्त्यावर उतरून गौतम अदानी आणि अदानी समूहाविरोधात निदर्शने करत आहेत. असे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने पसरत आहेत. हैदराबाद काँग्रेस सेवा दलानेही अलीकडेच असा फोटो शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियात अदानीविरोधात निषेध, अशा कॅप्शनसह इतरही अनेक फोटो, व्हिडिओ इंटरनेट विश्वात अगदी वणव्यासारखे पसरत आहेत. हे सारे अगदी अलीकडचे असल्याचा व हिंडेनबर्ग अहवालानंतर ऑस्ट्रेलियात रोज निदर्शने होत असल्याचा दावा केला जात आहे.

People protest against Adani in Brisbane. Fact Check Viral Video ऑस्ट्रेलयातील अदानीविरोधातील निदर्शने
ऑस्ट्रेलयातील अदानीविरोधातील निदर्शने (फाईल फोटो : क्रेडिट – गार्डियन/ गुगल)

ऑस्ट्रेलियात अदानीविरोधात निदर्शने, यामागील सत्य काय, नेमका प्रकार काय, खरेच हे आताचे फोटो, व्हिडिओ आहेत की जुने, ते आपण जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियात अदानींच्या विरोधातील असंतोष काही नवा नाही. ऑस्ट्रेलियातील कार्मायकेल खाणीच्या विरोधात हजारो ऑस्ट्रेलियन नागरिकांचा संघर्ष गेली 5 वर्षे सुरू आहे. अदानी वादग्रस्त क्वीन्सलँड कोळसा प्रकल्पाला स्व-वित्तपुरवठा करणार, अशा घोषणेनंतरच ऑस्ट्रेलियात निषेधाचे वारे वाहत आहेत. मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन आणि केर्न्स येथे आंदोलकांनी या घोषणेनंतर मोर्चे काढले होते. 15,000 शालेय विद्यार्थ्यांनी हवामान बदलावर सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध निदर्शने केली होती. पर्यावरणवादी व नागरिकांच्या रेट्यापुढे झुकून अदानीला या वादग्रस्त प्रकल्पाचा आकार आणि व्याप्ती कमी करावी लागली होती. तरीही ब्रिस्बेनमध्ये, शेकडो निदर्शकांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अदानीच्या मुख्यालयाबाहेर धरणे दिली होती.

हिंडेनबर्ग अहवालानंतर अमेरिकी बाजार नियंत्रकांनी अदानीच्या व्यवहारांची तपासणी करणार असल्याचे म्हटले आहे. जनक्षोभ पुन्हा उसळत असला तरी तूर्तास अजून मोठी आंदोलने सुरू झालेली नाही. निदर्शने, आंदोलनांचे जुनेच फोटो व व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी ऑस्ट्रेलयातही जोर शर्यत आहे. तरीही काही लोक स्टॉप अदानीचे फलक हातात घेऊन निषेध करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ आताचे नाहीत. ते 2017 मधील ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील काँगो बीच येथील बहुतांश फोटो व व्हिडिओ आहेत. तेव्हा अदानीला खाणीची परवानगी मिळाली होती.

Australia Public Protest Against Adani A protestor wearing a mask depicting Adani Group chairman Gautam Adani is seen during a protest against the Carmichael coal mine in Brisbane. ऑस्ट्रेलियात अदानीविरोधात निदर्शने
ऑस्ट्रेलियात अदानीविरोधात निदर्शने (फाईल फोटो : क्रेडिट गार्डियन/गुगल)

हे सुद्धा वाचा : 

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

राष्ट्रवादाच्या नावाखाली अदानीचे गोलमाल, पण फ्रॉडच्या सत्यापासून पळता येणार नाही; हिंडनबर्गचा जोरदार प्रहार

Supriya Sule : गुजराती गरब्याच्या तालावर सुप्रिया सुळे बेभान, स्पेशल डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल

या मंजुरीनंतर ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी अदानी समूहाविरोधात निदर्शने झाली होती. कार्मायकेल खाणीमुळे पर्यावरणाची हानी होईल, असा नागरिकांचा आक्षेप आहे. तो आजही कायम असला तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडिओ जुनेच आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने नॉर्थ क्‍वीन्सलँडमधील कोळसा खाणकामावर स्थगिती आणण्‍याची मागणी करण्‍यासाठी बहुतांश ही जुने निदर्शने आहेत. आत्ताचा असल्याचे सांगून हे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.
अर्थात, ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (एएसआयसी) या नियामक संस्थेने आताच्या अदानीवरील ताज्या आरोपांचे पुनरावलोकन करण्याची व चौकशीची भूमिका घेतली आहे. यावर, अदानीने तिकडेही भारतात गायलेले रडगाणे सुरू केले आहे. हिंडेनबर्ग अहवाल हा अदानी समूहाच्या कंपन्यांमधील शेअर्सची विक्री करून स्वतः नफा मिळवण्यासाठी (शॉर्ट सेलिंग) प्रयत्न आहे. अदानीच्या ऑस्ट्रेलियन व्यवसायांशी संबंधित व्यवहार भ्रामक मार्गाने सादर केले जात आहेत, असे अदानीच्या निवेदनात म्हटले आहे.

Adani Go Back, Stop Adani, Australia Public Protest Against Adani, Fact Check, Viral Video

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी