32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं एकतावादी ताकदीने उतरणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं एकतावादी ताकदीने उतरणार

टीम लय भारी 

 
ठाणे :  येणार्‍या काळात होऊ घातलेल्या सर्वच महानगर पालिका(Mahanagar Palika), नगरपालिका(Nagar palika), नगरपरिषदा(Nagar parishad), जिल्हा परिषदा(Jilha Parishad), पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये (Election) रिपाइं एकतावादी हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यात येईल, असा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) एकतावादीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. (The Republican Party of India is a political party in India)  

रिपाइं (Republican Party of India)  एकतावादीची राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष तथा भिवंडी महानगर पालिकेचे विद्यमान सभागृह नेते विकास निकम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी वर्तक नगर येथे पार पडली. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे, राष्ट्रीय महासचिव प्रल्हाद सोनावणे, उत्तम खडसे, राहूल मून यांच्यासह राज्यभरातील सर्वच जिल्हाध्यक्ष, विभागिय अध्यक्ष उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, नागपूरसह अन्य नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये रिपाइं (Republican Party of India) एकतावादीने आपले उमेदवार उभे करावेत, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आणि प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविताना समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत सुतोवाच केले. तसेच, आगामी काळात ज्या ठिकाणी सर्व रिपाइं गटांचे एकीकरण करुन निवडणुका लढविणे शक्य आहे; तिथे रिपाइं एकतावादी पुढाकार घेऊन रिपब्लिकन फ्रंट निर्माण करेल, असेही जाहीर करण्यात आले.

हे सुध्दा वाचा:

समस्याओं के निराकरण के लिए उपजिला अस्पताल के सामने प्रदर्शन, 2 मार्च को होगी बैठक

Ramdas Athawale : ‘हम भी नही कुछ कम’ आठवले यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी