29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसईबाईंच्या समाधीस्थळाचा पुनर्विकास होणार !

सईबाईंच्या समाधीस्थळाचा पुनर्विकास होणार !

टीम लय भारी

मार्गासनी : राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केली.लवकरच याचा अहवाल तयार करुन शासनाला पाठविणार असल्याचे सांगितले(Saibai’s mausoleum to be redeveloped!).

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाईंचे समाधीस्थळ राजगडाच्या पायथ्याशी आहे. याची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री हर्षाली मल्होत्रासह मान्यवरांना भारतरत्न डॉ आंबेडकर आणि बुद्ध शांती पुरस्कार प्रदान

Mhada House Mumbai : मुंबईत म्हाडाचे 22 लाखांत मिळणार स्वप्नातील घर

महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून, या समाधी परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी विविध भागांच्या वरिष्ठ अधिका-यांसह या परिसराची पाहणी करावी आणि त्याचा सर्वकष आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परीषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी दिले होते.

आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

In Mumbai a new restaurant brings Nordic design to a 19th century building

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाधीस्थळासाठी व पर्यटनासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी समाधीस्ळाचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी