28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेट'पाकिस्तान जिंदा भाग' म्हणत सेहवाग करतोय पाकिस्तानला ट्रोल!

‘पाकिस्तान जिंदा भाग’ म्हणत सेहवाग करतोय पाकिस्तानला ट्रोल!

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) आता शेवटच्या चरणात असून काही दिवसांतच नॉकआउट सामन्यांना सुरुवात होईल. भारतासह (Indian Cricket Team), दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने आपली जागा सेमीफायनलमध्ये पक्की केली असून चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंडने आपली जागा जवळजवळ पक्की केली आहे. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानलाही (Pakistan Cricket Team) जाण्याची संधी असून त्यांना लगभग अशक्यप्राय अश्या फरकाने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे, पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. यावरूनच भारताचा माजी खेळाडू आणि तडाखेबाज खेळाडू विरेन्द्र सेहवाग (Virendra Sehwag) याने पाकिस्तानची टर उडवत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

सेहवागने त्याच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरुन पोस्ट करत पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्रोल केले आहे. ‘बाय बाय पाकिस्तान’ अश्या आशयाचा फोटो अपलोड करत ‘पाकिस्तान जिंदा भाग’, ‘घरी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाण करा,’ असा कॅप्शन दिला आहे. त्याच्या या पोस्टला 1 लाख 33 हजाराहुन अधिक लोकांनी लाइक केले असून 16 हजार लोकांनी रीट्वीट केले आहे.


त्यानंतर, सेहवागच्या या कृतीवर कमेंट्सचा पाऊस पडला असून काहींनी त्यांचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला आहे. याबाबत, स्पष्टीकरण देताना सेहवागने अजून एक ट्वीट करत म्हंटले, “21 व्या शतकात 6 एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. 6 प्रयत्नांमध्ये, 2007 मध्ये फक्त एकदाच आम्ही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलो नाही आणि गेल्या 6 पैकी 5 विश्वचषकांमध्ये पात्र ठरलो. दुसरीकडे पाकिस्तानने 6 प्रयत्नांत केवळ एकदाच 2011 मध्ये उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे.”


सेहवाग पुढे म्हणाला, “ते आयसीसी आणि बीसीसीआयवर चेंडू आणि खेळपट्टी बदलल्याबद्दल हास्यास्पद आरोप करतात. पराभूत होऊनही आम्ही दुसऱ्या संघाकडून हरलो तेव्हा त्यांचे पंतप्रधान आमची थट्टा करतात. इथे पोहोचल्यावर, त्यांचा खेळाडू आमच्या सैनिकाची थट्टा करण्यासाठी हैदराबादमध्ये चहाचा आस्वाद घेतानाचे फोटो पोस्ट करतो. पीसीबी प्रमुख ऑन कॅमेरा आपल्या देशाचा उल्लेख दुष्मन मुल्क असा करतात. आणि काही लोक त्यांच्या द्वेषासाठी प्रेमाची अपेक्षा करतात. हा एक दुतर्फा रस्ता आहे.”

हे ही वाचा 

श्रीलंका संघाची ‘ना घर का ना घाट का’ स्थिती

टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी गिलख्रिस्टने सांगितला कानमंत्र

‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा वसिम आक्रमवर विश्वास नाही’

आपल्या ट्विटच्या शेवटी सेहवाग म्हणतो, “जो चांगला वागतो त्याच्याशी आपण खूप चांगले वागतो आणि नाहीतर योग्य वेळी मैदानावर तसेच मैदानाबाहेरही. व्याजासकट परत करणे हा माझा मार्ग आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी