32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्ग झालाय जीवघेणा; क्रेन अपघातातील मृतांचा आकडा 17, मृतांच्या...

समृद्धी महामार्ग झालाय जीवघेणा; क्रेन अपघातातील मृतांचा आकडा 17, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून मदत

समृद्धी महामार्गावर दुर्घटनेचे सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरात सुरु आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना शहापूरमधील सरलांबे गाव परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगार ठार झाले. तीन जण जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमीवर शहापूर, ठाण्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी पोहचून त्यांनी मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. रात्री उशिरा मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी पोहचत आढावा घेतला असून दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. सुरक्षेची कोणताही उपाययोजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झालाय. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. गर्डर आणि मशीनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांची निश्चित संख्या किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही. या प्रकरणी नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या VSL कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात शहापूर पोलीस स्थानकात कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेचा प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, संपूर्ण घटना अचानक घडली काही करण्याआधीच 35 मीटर वरून आम्ही खाली कोसळलो, ढिगा ऱ्याखाली माझे अनेक साथीदार होते अशी माहिती जखमी कर्मचाऱ्याने दिली. घटनेची सखोल चौकशी केली जाणार अशी माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. चौकशीमध्ये जो दोषी मिळाला त्याच्यावर कठोर कारवाई सरकार करणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबाबरोबर माझ्या सहवेदना आहेत. तर, जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. एनडीआरफ आणि स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी