33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसामना वाचत नसल्याच्या नाना पटोलेंच्या टीकेला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

सामना वाचत नसल्याच्या नाना पटोलेंच्या टीकेला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात. या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून नाना पटोले यांना पुन्हा एकदा चिमटा काढण्यात आला. परंतु सोनिया गांधीही ‘सामाना’ची दखल घेतात अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे(Shiv Sena MP Sanjay Raut has responded to Nana Patole criticism by saying that he takes care of ‘Saamana’).

“काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ (Saamana) वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचे पुढचे पाऊल, मोदींना पत्र

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तुर्तास ब्रेक : राजेश टोपे

 “पश्चिम बंगालमध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही,” असे शिवसेनेने सांगितले आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर ‘सामना’त (Saamana) अग्रलेख छापून आला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले होते (Congress state president Nana Patole had slapped Sanjay Raut). आम्ही संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही आणि ‘सामना’ (Saamana) ही वाचत नाही, असे त्यांनी म्हटले होते.

Congress forms five-member panel to evaluate dismal performance in Assembly elections

सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ (Saamana) ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा ‘सामना’ने (Saamana) उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी