33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरात आजपासून कलम 144 लागू ; वाचा काय आहेत नियम

नागपूरात आजपासून कलम 144 लागू ; वाचा काय आहेत नियम

नागपूर पोलिसांनी शहरात 9 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू केले आहे. या कालावधीत रसत्यावर थांबून भीक मागणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागपूरात 21, 22 आणि 23 मार्च रोजी G20 ची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक शहरात ठिकठिकाणी रसत्यावर भीक मागणाऱ्यांची शिवाय वाहनचालकांकडून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथ्यांची गर्दी दिसत असते. भिकारी आणि तृतीयपंथ्यांमुळे अनेकदा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय अशा प्रकरणांमुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणावर उपाय म्हणून नागपूर पोलिसांनी एक आदेश जारी केला आहे. नागपूर पोलिसांनी शहरात 9 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू केले आहे. या कालावधीत रसत्यावर थांबून भीक मागणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागपूरात 21, 22 आणि 23 मार्च रोजी G20 ची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी पाहुण्यांचे आगमन नागपूरात होणार आहे. या परदेशी पाहुण्यांसमोर शहराची शोभा जाऊ नये यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर पलिसांनी जारी केलेल्या आदेशामध्ये दिनांक 9 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत संपूर्ण नागपूर शहरात कलम 144 लागू केला असल्याचे जाहिर केले आहे. यावेळी कोणत्याही भिकाऱ्याने किंवा इतर कुठल्याही तत्सम व्यक्तीने या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम 188 अन्वये त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल असे ही नागपूर पोलिसांनी काढलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. गेले काही दिवस नागपूर शहरात विविध रस्त्यांवर चौकांवर ट्रॅफिक सिग्नल्सवर भिकारी तसेच तृतीयपंथयाद्वारे वाहन चालकाकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले होते. काही वेळी पैसे मागणाऱ्यांकडून दमदाटी केल्याचे आणणि त्यातून वाद निर्माण झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. ही पार्श्वभूमी लक्षाकत घेऊनच पोलिसांकडून हा आदेश जारी केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र बजेट 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट; घोषणांचा वर्षाव होणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी आज ठाण्यात होणार ‘राजगर्जना’

सिनेसृष्टीवर शोककळा: प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड

दरम्यान, सध्या नागपूरात अवघ्या दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आलेल्या या आदेशाचे अनेक ठिकाणांवरून सामान्य नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. विशएष म्हणजे याप्रकारचा आदेश महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात लागू करावा अथवा रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि तृतीयपंथ्यांकडून होणाऱ्या दमदाटीवर आळा घालावा यासाठी काहीतरी कठोर नियम तयार करण्यात यावे अशी मागणीही यावेळी अनेकांकडून केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी