29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांनी शिक्षकांचे केले कौतुक

शरद पवार यांनी शिक्षकांचे केले कौतुक

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे या संस्थेच्या ११०व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी कोरोना महामारीच्या संकटात शिक्षकांनी केलेल्या कामाबाबत सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे (Sharad Pawar has praised the teachers).

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे प्रचंड संकट आले होते. यामुळे याचा मोठा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला होता. तसेच अनके क्षेत्रातील व्यवसाय पूर्णत: ठप्प झाले आहेत.

गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार घेणार भेट

शरद पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार

या आव्हानात्मक परिस्थितीतही अ. भा. मराठा शिक्षण परिषद संस्थेतील अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेतील पदाधिकारी यांनी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व कामकाज अखंडरीत्या कसे चालू राहील याची खबरदारी घेतली. ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar has praised the teachers
शरद पवार

शरद पवारांच्या मागोमाग जयंत पाटीलांनीही घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

Centre Rejects Sharad Pawar’s Allegation That Outsiders Were Called In To Manhandle MPs In Rajya Sabha

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विशेष परिणाम झाला आहे. अशा काळात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक काम केले आणि ही कामे असेच चालू राहावे, असे शरद पवार म्हणाले (Sharad Pawar said Corona epidemic has had a significant impact students education).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी