33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमोदीसाहेब, हे घ्या तुमच्या आरोपाला उत्तर...

मोदीसाहेब, हे घ्या तुमच्या आरोपाला उत्तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, (26 ऑक्टोबर} शिर्डी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी थेट शरद पवार यांनाच लक्ष्य केले. ‘कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा थेट सवाल मोदींनी केला. त्यावर, शरद पवार यांनी आज शनिवारी, (28 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिले. ‘पंतप्रधान हे पद ही एक संस्था असून संस्थेची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे मला समजतं. या पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली. ती वास्तवापासून दूर असेल तर त्याचं चित्र समोर मांडावं यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे,’ असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यावेळी म्हणाले, “2004 ते 2014 या काळात मी देशच्या कृषिमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली. 2004 साली जेव्हा कृषिमंत्री झालो, तेव्हा देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यावर पहिल्या दिवशी मला कटू निर्णय घ्यावा लागला. भारताला अमेरिकेकडून गव्हाची आयात करावी लागत होती आणि ही अस्वस्थ बिकट करणारी होती. त्या गहू आयातीच्या फाईलवर दोन दिवस मी सही केली नाही. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे त्याकाळी गरजेचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्यावेळी अन्नधान्य, डाळी यांच्या हमी भावात भरीव वाढ करण्याचे ठरवले. हा निर्णय घेतला नसता तर स्थिती बिघडली असती याची माहिती मनमोहन सिंग यांनी मला दिली.”


कृषिमंत्री असताना आणल्या अनेक योजना

“2004 ते 2014 या माझ्या कार्यकाळात तब्बल एका दशकात गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांच्या हमी भावात दुप्पटी पेक्षा अधिक वाढ करण्यात आली. अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची सुरूवात मी कृषिमंत्री असताना करण्यात आल्या. UPA सत्तेत असताना शेती आणि संलग्न क्षेत्रात सर्वंकष बदल घडवण्याच्या दिशेने अतिशय व्यापक, दूरगामी योजना सुरू करण्यात आल्या. यापैकी NHM आणि RKVI या दोन योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, देशाच्या कृषिक्षेत्राचा चेहरा मोहरा या योजनांमुळे बदलला,” असे ते पुढे म्हणाले.

यावेळी, शरद पवार यांनी आकडेवारी सादर करत 2004 ते 2014 या काळात गहु, तांदूळ, कापूस, सोयाबीन यांसारख्या सर्व पिकांच्या हमीभावात दुपटीने वाढ केली गेली. अन्नधान्याच्या हमी भावात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. भारत जगामध्ये तांदळाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश झाला तर गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला. ऊस, कापूस, ज्यूट, दूध, फळे, मासे आणि भाजीपाला यांच्या उत्पादनात देखील भारत पहिल्या – दुसऱ्या क्रमांकावर राहिला. फळांचे उत्पादन 45.2 दशलक्ष टनांवरून 89 दशलक्ष टनांपर्यंत गेले. पालेभाज्यांचे उत्पादन 88.3 दशलक्ष टनांवरून 162.9 दशलक्ष टनांपर्यंत वाढले.

हे ही वाचा 

‘तो’ व्हिडीओ का टाकला? फडणवीसांकडून उत्तराला बगल

धर्मरावबाबा आत्रामांची जबराट मोहीम, अन्नात घाण करणाऱ्या ‘नासक्या आंब्यांना’ चुन चुनके…

सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा, थेट हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा!

आयातीवर अवलंबून असणारा देश निर्यातदार झाला. त्यामुळे 2004 ते 2014 या 10 वर्षांत शेती व संलग्न उत्पादनांची निर्यात 7.5 अब्ज डॉलर वरून तब्बल 42.84 अब्ज डॉलरवर गेली. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना जवळपास 3 लाख कोटी रुपये मिळत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची खासगी सावकारी व कर्जबाजारीपणा ही मुख्य कारणे होती. त्या रोखण्यासाठी सुमारे 62 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफी करण्यात आली. सुरूवातीला व्याजदराचा दर 11 टक्क्यांवर होता. तो 4 टक्क्यांवर आणण्यात आला आणि वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 3 लाख कर्जावर व्याजदर हा 0 टक्क्यांवर आणण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी