31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय'तो' व्हिडीओ का टाकला? फडणवीसांकडून उत्तराला बगल

‘तो’ व्हिडीओ का टाकला? फडणवीसांकडून उत्तराला बगल

मी पुन्हा येणार, हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भाजपकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओने काल दिवसभर प्रचंड खळबळ उडवली. त्यानंतर तासाच्या आतच भाजपने त्यांच्या X अकाऊंटवरून तो व्हिडीओ काढून टाकला. पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा मेसेज गेला आणि याचाच अर्थ एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावरून जाणार असा होता. यावरून काल दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्रातील राजकारणात कधीही काहीही होऊ शकते याचा अनुभव सर्वांनी घेतल्यामुळे मुळात भाजपने हा व्हिडीओ का शेअर केला आणि केल्यानंतर एक तासात काढला, याचे पटेल असे उत्तर आजही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही. तरीही एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून कशाला येईल येईल, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. पण व्हिडीओ का टाकला, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, हा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ काल (२७ ऑक्टोबर) दिवसभर चर्चेत राहिला. मुळात तो भाजपने शेअर केला होता. त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. अनेक अर्थ काढले जात होते. एकनाथ शिंदे जाणार आणि देवेंद्र फडणवीस येणार, असा या व्हिडीओचा सरळ अर्थ काढला जात होता. इकडे एकनाथ शिंदेंच्या गटात अस्वस्थता सुरू झाली. त्यानंतर अवघ्या एका तासात भाजपने तो व्हिडीओ डिलीट केला आणि चर्चांना पुन्हा जोर आला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हौशी कार्यकर्त्याने तो व्हिडीओ अपलोड केला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर मार्गाने फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, अशी उपहासात्मक टीका केली. अखेर आज देवेंद्र फडणवीसांनी यावरील आज मौन सोडले.

‘एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यावर दिले आहे. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तरीही भाजपने व्हिडीओ का शेअर केला, याचे कारण सांगणे फडणीसांनी टाळले.

हे ही वाचा

मराठा आरक्षणावरून सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्यांना गावबंदी

धर्मरावबाबा आत्रामांची जबराट मोहीम, अन्नात घाण करणाऱ्या ‘नासक्या आंब्यांना’ चुन चुनके…

सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा, थेट हिवाळी अधिवेशनावर काढणार मोर्चा!

मोदींनंतर फडणवीसांचाही शरद पवारांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. असे असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली फक्त चार खासदार निवडून येतात त्यांचा धसका मोदींनी घेतला म्हणणे म्हणजे हास्यास्पद ठरेल, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांना लगावला. त्याचवेळी शरद पवार काय बोलले हे मी ऐकले नसल्याने मी काही बोलणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी