30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांनीही दिला होता शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा ....

बाळासाहेबांनीही दिला होता शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा ….

शिवसेना नेते संजय राऊत यांनी जागविली आठवण; शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राऊतांनी केले ट्विट; शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

बाळासाहेबांनीही दिला होता शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा …. ही आठवण जागविली आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राऊतांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की – 
एक वेळ अशी आली.. घाणेरडे आरोप.. प्रत्यारोप.. राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे.
जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.

हे सुद्धा वाचा : 

शरद पवारांनंतर कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे ?

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले ; नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. मात्र, हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली. पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar Resign, Balasaheb Thakre, Sanjay Raut Tweet , Shivsena Pramukh, Pawar Breath of Indian Politics

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी