32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयशरद पवारांनंतर कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे ?

शरद पवारांनंतर कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे ?

शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यास आता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अजित पवारांना मिळणार की सुप्रिया सुळे वडिलांचा राजकीय वारसा सांभाळणार, ही चर्चा आता देशाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यास आता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अजित पवारांना मिळणार की सुप्रिया सुळे वडिलांचा राजकीय वारसा सांभाळणार, ही चर्चा आता देशाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे स्थान मोठे आहे. त्यांची जागा घेणे राष्ट्रवादीतल्या इतर कोणत्याही नेत्यासाठी सोपे काम नाही. अर्थात अध्यक्षपदाची माळ कुणाला तरी घालावीच लावणार आहे. पक्षाची भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे पॅनल स्थापन करण्याची घोषणा पवारांनी केली आहे. पवारांच्या उत्तराधिकारी पदासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेतच. याशिवाय, जयंत पाटील यांचेही नाव संभाव्य दावेदारात घेतले जातेय. पवारांच्या अनपेक्षित निर्णयानंतर जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. काही कार्यकर्त्यांनी उपोषणाला बसण्याचाही इशारा दिला.

माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार 1960 पासून गेली 62 वर्षे सातत्याने कुठल्या न् कुठल्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

 

दोन दिवसांपूर्वीच पवारांनी भाकरी फिरवत, नवे नेतृत्त्व पुढे आणण्याची गरज बोलून दाखविली होती. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मी केवळ अध्यक्षपदावरून पायउतार होत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. आपण सर्वांसह एकत्रपणे पक्षाचे काम करत राहू असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. मात्र, हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली. पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 

शरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना मिळ्णार संधी

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले ; नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

दुसरीकडे, शरद पवारांच्या निर्णयाबाबत अजित पवार म्हणाले, की अशा प्रकारे राजीनामा देणे योग्य नाही. याबाबत समितीची बैठक घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

Ajit Pawar or Supriya Sule, Who Will Be Next NCP Chief, NCP Chief After Sharad Pawar , Maharashtra Politics , Nationalist Congress Party

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी