29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार म्हणाले, मी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नाही

शरद पवार म्हणाले, मी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नाही

टीम लय भारी

मुंबई :  ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजनावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच तोफ डागली होती. आता पुन्हा शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे. निमंत्रण दिलं तरी आपण राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे.

“सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही…

“महाराष्ट्र विकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. तसंच राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. “महाविकास आघाडीचा रिमोट माझ्या हाती नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांचं एकमत झालं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी