33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्र...आणि शरद पवार रमले चित्रात

…आणि शरद पवार रमले चित्रात

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सगळ्यात जास्त व्यस्त शेडुल्ड असणारे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार. शरद पवार सकाळी मुंबईला असतील, दुपारी पुण्याला आणि संध्याकाळी नासिकला याचा काही नेम नाही. कायम राज्यभर फिरणारे, नेहमी सामान्य कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

राजकारणी पवार यांच्यात रसिकता ठासून भरलेली आहे. वेळ मिळाल्यावर ते छान नाटके पाहतात. सिनेमे पाहतात. अशाच कलासक्त असणाऱ्या पवारांनी शनिवारी वेळात वेळ काढून मुंबईतील नेहरू सेंटर येथे ‘महाराष्ट्र आर्ट फेयर’ या चित्र प्रदर्शनास भेट दिली.

चित्र प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात वकील, अभियंते, डॉक्टरस्, इंटिरियर डिझायनर, बँकर्स, आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या व्यावसायिक पदावर असणाऱ्या कलाकार मंडळीचे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

आपला व्यावसायिक व्याप सांभाळून कलेमध्ये देखील तितकेच वाहून नेणाऱ्या या कलाकारांचे चित्रप्रदर्शन पाहून मनोमन सर्व व्यावसायिकांचे कौतुक वाटले. आपले काम आणि आपली आवड या दोन्ही गोष्टींचे समीकरण मला त्यांच्या चित्रशैलीतून दिसून आले. माणसाच्या अंगी कुठला ना कुठला तरी कलागुण हा असायलाच हवा आणि तो त्याने जोपासायलाच हवा असे माझे मत आहे. असे यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले. डिंपल फडतरे, डॉ. सुहास गावडे त्याचप्रमाणे महेंद्र कोंडेकर यांसोबत अनेक कलाकारांच्या चित्रकृती कलाप्रेमी मंडळींना आकर्षित करत होत्या.

हे सुद्धा वाचा 
गणरायासाठी थर्माकोलच्या मखरांऐवजी सजावटीसाठी कोणत्या वस्तू बाजारात मिळतायत ?
दहीहंडीत फुगड्या घालून चार्ज झालेले सोमय्या पुन्हा मैदानात!
अक्षय कुमार करणार एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन आणि दिशा पटानी सोबत धमाल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी