30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar शरद पवारांच्या लाडक्या आमदाराने चालवली एसटी

Sharad Pawar शरद पवारांच्या लाडक्या आमदाराने चालवली एसटी

महाराष्ट्रातल्या दुसऱ्या आमदारांने एसटीचे स्टेअरिंग हातात घेतले. एसटी म्हणजे आपली लाल परी. कधी तरी रस्त्यात एकदम बंद पडते. आशा वेळी नेमके काय करावे हे चालकाला देखील सुचत नाही. प्रवाशांचा तर गोंधळच उडतो. अहमदनगर रस्त्यावर एसटी बस बंद पडली होती. त्याचवेळी त्या मार्गावरुन आमदार निलेश लंके जात होते. त्यांनी लगेच आपली गाडी थांबली आणि विचारपूस केली. आमदार असलेल्या निलेश लंके यांनी नुसती विचारपूसच केली नाही तर ते गाडीतून उतरले आणि त्यांनी गाडीचे स्टेअरिंग हातामध्ये घेतले.

Sharad Pawar शरद पवारांच्या लाडक्या आमदाराने चालवली एसटी

अहमदनगर-दौंड रस्त्यावर कोळगाव परिसरामध्ये श्रीगोंदा-नगर एसटी बस बंद पडली होती. बराच वेळ धक्का मारुन देखील बस सुरू झाली नाही. त्याच वेळी त्या मार्गाने न‍िलेश लंके देखील जात होते. त्यांनी आपली कार थांबवली.‍ विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी बसला धक्का मारायला मदत देखील केली. तरीही बस सुरू होत नव्हती. ते पाहून ते थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये चढले आणि त्यांनी एसटीचे स्टेअरिंगच हातात घेतले. त्यामुळे प्रवाशी देखील आश्चर्य चकित झाले. त्यांच्या या गोष्टीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जनतेच्या कामासाठी लोकप्रतिधींनी धाऊन जायला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. कोरोना महामारीच्या वेळी देखील त्यांनी स्वत: हॉस्पीलमध्ये जाऊ रुग्णांची सेवा केली होती. कोरोना महामारीमध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये लोकांना खुप मदत केली आहे. त्यामुळे निलेश लंकेंचा नाव लौकीक वाढला असून, जनतेच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे. निलेश लंके यांची राजकीय कादकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. एका सभेतील वादग्रस्त परिस्थितीमुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील हंगा या गावचे आहेत. ते अत्यंत सामान्य कुटूंबातील आहेत.

हे सुद्धा वाचा

NASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार

VIDEO : ‘बाळासाहेबांची शिवसेना आमच्यासोबत, शिल्लक राहिली ती पेंग्विन सेना’

शिवसेना – शिंदे गटात राडा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी एसटी चालवून जनतेला धक्का दिला होता. या घटनेमुळे त्यांचे सगळीकडे कौतुक झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी