31 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रखासदार गिरीश बापट यांची शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

खासदार गिरीश बापट यांची शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. (Pune BJP MP Girish Bapat) बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. पवारांनी आज रुग्णालयात जाऊन बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले गिरीश बापट म्हणजे पुण्याचे खरे बाजीराव! त्यांना गेल्या 40 वर्षांत कुणी हरवू शकले नाही. बापट यांचे सर्व पक्षात चांगले संबंध आहेत. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही बापट यांनी पुण्याच्या राजकारणात गेली 40 वर्षे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. शहराच्या राजकारणात तर त्यांचे चांगलेच वजन आहे. अर्थात, गेले काही दिवस बापट हे पक्षातच बाजूला पडल्याचे चित्र आहे. अलीकडेच त्यांनी मी सर्वांवर नाराज असल्याचेही म्हटले होते. त्यातच ते आता गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आज रुग्णालयात जाऊन पवारांनी बापट यांची भेट घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अंकुश काकडेही त्यांच्यासोबत होते.

बापट आणि पवार यांचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात बापटांचेही राजकारण फुलू शकले, असे सांगितले जाते. बापटही जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा पवारांच्या कार्याची मनापासून जाहीर स्तुती करत असतात. आज बापट यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनीच स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ही माहिती दिली. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, असे ट्विट पवारांनी या भेटीनंतर केले. बापट यांचा रुग्णालयातील फोटोही पवारांनी शेयर केला आहे.

हे सुद्धा वाचा : 

अजित पवारांनी भाजप खासदाराची घेतली भेट

असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे, शरद पवार कडाडले

मोदींना महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार हवे होते, पण मी नाही म्हणालो : शरद पवार

Pune BJP MP Girish Bapat, NCP Chief Sharad Pawar, गिरीश बापट, Deenanath Mangeshkar Hospital, शरद पवार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी