30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसातारच्या पावसांत शरदपवार भिजले,अन् त्यात देवेंद्र फडणवीस यांंची मी पुन्हा येईनची दर्पोक्ती...

सातारच्या पावसांत शरदपवार भिजले,अन् त्यात देवेंद्र फडणवीस यांंची मी पुन्हा येईनची दर्पोक्ती वाहून गेली.

शरद पवारांच्या मदतीसाठी मागच्या वेळी सातारचा पाऊस आला होता, यावेळी मोहिते पाटील निमित्त ठरतील. साडेचार वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या मदतीला सातारचा पाऊस आला होता

शरद पवारांच्या मदतीसाठी मागच्या वेळी सातारचा पाऊस आला होता, यावेळी मोहिते पाटील निमित्त ठरतील (Sharad Pawar speech in the rain at satara). साडेचार वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या मदतीला सातारचा पाऊस आला होता. या पावसाने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांना विधानसभेत चांगल्या जागा मिळवून दिल्या होत्या. त्यावेळी झालेल्या सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता.

देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन…’ ही दर्पोक्ती लोकांना आवडली नव्हती. शरद पवार यांच्यावर ईडीच्या कारवाईचाही अयशस्वी प्रयत्न भाजपने करून पाहिला होता. त्यातही भाजपला यश आलं नव्हतं. उलट उतारवयात सुद्धा पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या शरद पवारांबद्दल सामान्य जनतेच्या मनात आदर वाढला होता. राष्ट्रवादी व काँग्रेस प्रत्येकी पंचवीसेक जागा मिळवतील असंच तेव्हा चित्र होतं. पण प्रत्यक्षात राष्ट्रवादीने ५४ व काँग्रेसने ४५ जागांवर यश मिळवलं होतं. या यशामुळे भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या सहकार्याने काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी