27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवार यांचा चमत्कार, नदी सुधाराचे स्वप्न साकार !

सुधीर मुनगंटीवार यांचा चमत्कार, नदी सुधाराचे स्वप्न साकार !

राज्यातील गोदावरी, वैनगंगा, कृष्णा, तापी. नर्मदा या प्रमुख नद्यांसह सर्व उपनद्यांमधील जलप्रदूषणाला आळा घालून लोकसहभागाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केलेल्या “चला जाणू या नदीला” या नदी संवर्धन मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नद्यांची स्वच्छता करण्याचे काम मोठ्याप्रमाणात सुरु असल्याची माहिती वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खास “लय भारी” शी बोलताना दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या अनुषंगाने प्रारंभ झालेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११७ नद्यांचे संवर्धन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुनगंटीवार म्हणाले, नद्यांमधील वाढत्या जलप्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून नदी संवर्धन योजना हाती घेण्याची कल्पना मला सुचली. त्यानुसार नदी सुधार क्षेत्रात मोठे योगदान असलेले जलपुरुष राजेंद्रसिंह राणा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवाग्राम, वर्धा येथून “चला जाणू या नदीला” या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बघता, बघता या योजनेला व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांकडून व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. नदी काठावरील शहर, गावांमध्ये नदी संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली असून लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

आपल्या राज्यात सुमारे २० हजार किलोमीटर क्षेत्रात २०० नद्या व उपनद्या आहेत. या सर्व नद्यांमधील जलप्रदूषण रोखण्यासह नद्यांचे पावित्र्य कायम राखण्यासाठी नदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे. स्थानिक नागरिक, महाविद्यालयीन तरुण-तरुणी स्वयंप्रेरणेने नदी स्वच्छता मोहिमेत सामील होत असून संपूर्ण अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

नदीच्या प्रवाह क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढत चालल्यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. नद्यांना वारंवार पूर येत असल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नद्यांमध्ये सांडपाणी व उद्योगातील रसायने सोडली जात असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. गणपती विसर्जनाच्या काळात नद्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचे विसर्जन करण्यामुळे देखील नद्यांचे पाणी प्रदूषित होत असून नद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचला आहे. या मोहिमेत जलतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नद्यांचा संपूर्ण अभ्यास करून नदी संवाद यात्रा काढली जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

नदी संवाद यात्रा नांदेडमध्ये
” चला जाणू या नदीला ” मोहिमेंतर्गत सध्या नांदेड जिल्ह्यातील मन्याड नदी स्वच्छता अभियान सुरु असून १४० किलोमीटर परिसरात असलेल्या या नदीवर जलप्रहरी आणि नागरिकांच्या सहकार्याने नदी स्वछता कार्यक्रम राबविला जात असल्याची माहिती या मोहिमेचे राज्य समन्वयक डॉ. सुमंत पांडे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा
निरव मोदी, ललित मोदी, गौतम अदानी या चोरांना चोर म्हटल्यास गुन्हा ठरतो का; नाना पटोलेंचा मोदींना सवाल
चंद्रकात पाटलांचा डाव पुण्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी उधळला
एका वर्षाच्या शिक्षेच्या सुनावणीत 2 महिने आधीच नवज्योत सिद्धू तुरुंगातून बाहेर?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी